पाकिस्तान हरला आणि शोएब अख्तर भलताच खुश झाला; काय आहे कारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shoaib akhtar Pak vs AFG: T20 इंटरनॅशनलमध्ये इतिहास रचताना अफगाणिस्तानने हादरवले आहे. पहिल्यांदाच त्यांनी पाकिस्तानला टी-20 मध्ये पराभूत करून इतिहास रचला. शारजाह येथे शुक्रवारी (24 मार्च) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानचे चाहतेच नाही तर पाकिस्तानी संघाचा माजी स्टार वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही या विजयाने खूश आहे. तो म्हणाला की आमचे पठाण बांधव विजयी झाले आहेत. यामुळे तो खूप खूश आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला, असं अख्तर म्हणाला. (Shoaib Akhtar was overjoyed after Afghanistan’s historic victory over Pakistan)

रोहित-द्रविडवर संघातील खेळाडू नाराज?, दिग्गज पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा मोठा दावा

मोहम्मद नबी सामन्याचा हिरो ठरला

शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला 92 धावांवर रोखले होते. यामध्ये मोहम्मद नबीसह सर्व गोलंदाजांनी समान योगदान दिले. यानंतर अफगाणिस्तान संघाने 13 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. फलंदाजीतही नबीने नाबाद 38 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. नजीबुल्लाहने दोन चौकारांच्या मदतीने 17 धावांची नाबाद खेळी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशाप्रकारे अफगाणिस्तानच्या संघाने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील या मालिकेतील पुढील सामना 26 मार्च रोजी होणार आहे.

Virat Kohli: शोएब अख्तरचं मोठं भाकित, म्हणाला, ‘विराट 110 शतक करणार’

ADVERTISEMENT

या विजयावर अख्तर खूश आहे

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ‘अफगाणिस्तानने पाकिस्तानला व्यवस्थित हरवले आहे. अफगाणिस्तान एक उत्तम संघ आहे. त्याची गोलंदाजी खूप मजबूत आहे. फिरकीपटू उत्कृष्ट आहेत. नबीने शानदार गोलंदाजी केली आहे. फिरकीपटू ही त्यांची ताकद आहे. भारतामध्ये जेव्हा विश्वचषक होणार आहे, तेव्हा अफगाणिस्तान एक मजबूत संघ असेल. आमचे पठाण बांधव विजयी झाले याचा मला खूप आनंद आहे. पश्तून उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहेत.

ADVERTISEMENT

अख्तर म्हणाला, ‘शादाबने हिंमत गमावू नये. तू खूप चांगला कर्णधार आहेस. अफगाणिस्तान पहिल्यांदाच पाकिस्तानकडून जिंकला याचा मला खूप आनंद आहे. त्यांन उत्कृष्ट क्रिकेट खेळून विजय मिळवला आहे. अफगाण लोक चांगले करतात तेव्हा मला ते आवडतात. मी त्यांच्यासोबत आहे. पण तुम्हाला पुढचा सामना जिंकण्याची गरज आहे, जेणेकरून सामना बरोबरीचा होईल, असं शोएब शादाबला म्हणाला.

भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट; नोबॉलवरून शोएब अख्तर भडकला

    follow whatsapp

    ADVERTISEMENT