युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण, व्हीडिओ आला समोर

मुंबई तक

युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. युक्रेनने रशियासमोर हात टेकलेले नाहीत. उलट दोन हात करून रशियासोबत युद्ध सुरू केलं आहे. जसा देता येईल तसा निकराचा लढा युक्रेनकडून दिला जातो आहे. अशात तिथे भारतीय विद्यार्थीही अडकून पडले आहेत. रशियाचं सैन्य युक्रेनमधल्या नागरी वसाहतींनाही लक्ष्य करतं आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताकडून पूर्ण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. युक्रेनने रशियासमोर हात टेकलेले नाहीत. उलट दोन हात करून रशियासोबत युद्ध सुरू केलं आहे. जसा देता येईल तसा निकराचा लढा युक्रेनकडून दिला जातो आहे. अशात तिथे भारतीय विद्यार्थीही अडकून पडले आहेत. रशियाचं सैन्य युक्रेनमधल्या नागरी वसाहतींनाही लक्ष्य करतं आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थ्यांना परत आणलंही गेलं आहे. मात्र आता युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

धगधगतं युक्रेन! बेलारुसच्या सीमेवर रशियन शिष्टमंडळाला भेटण्यास तयार- झेलेन्स्की

युक्रेनमध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर थंडी आहे. त्याचाही सामना सगळ्यांनाच करावा लागतो आहे. अशात भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे. युक्रेनच्या सीमेवर रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या सुरक्षारक्षकाने भारतीय विद्यार्थ्याला लाथ मारली तो व्हीडिओ व्हायरल होतो आहे. संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारताने युक्रेनच्या बाजूने मत का दिलं नाही? असा जाब तुमच्या भारतीय दुतावासाला विचारा असंही हा रक्षक या विद्यार्थ्याला उद्देशून म्हणतो आहे.

युक्रेनमधून आत्तापर्यंत 800 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आलं आहे. मात्र साधारण 15 हजार भारतीयांना युक्रेनहून भारतात आणलं जायचं आहे. युद्ध सुरू झाल्याने खाण्यापिण्याची टंचाई, त्यानंतर झालेली ही मारहाण या सगळ्यामुळेच आपल्या मुलांचं काय होणार ही चिंता भारतात असलेल्या पालकांना सतावते आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp