PM Modi meets CM : 8-10 जिल्ह्यांत अजुनही संसर्ग, लसींचे ज्यादा डोस द्या – मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यात महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होण ही देशासाठी चिंतेची बाब असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ८० टक्के नवे रुग्ण आणि ८४ टक्के रुग्णांचा मृत्यूदेखील याच सहा राज्यांमध्ये होत असल्याची बाब मोदींनी अधोरेखित केली.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गर्दी हे मोठं आव्हान असल्याचं सांगितलं. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने देश पातळीवर व्यापक धोरण आखावं अशी मागणी केली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी हजर होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार काय काय उपाययोजना आखत आहे याची माहिती दिली. महाराष्ट्रात रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत असला तरीही यात आणखी घट होणं गरजेचं आहे. फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरणही वेगाने पूर्ण करीत आहोत, लसी वाया जाण्याचे प्रमाणही कमी केले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून उद्योगांना फटका बसू न देण्यासाठी तशा उपाययोजना करण्यात येत आहेत असे आश्वस्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला ज्यास्तीत जास्त लसींचे डोसेस मिळावेत अशी मागणी केली. महत्वाच्या औषधांच्या किमती नियंत्रित कराव्यात तसेच कोविडोत्तर उपचारांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची केंद्रे सुरु करण्यासाठी केंद्राने मदत करावी अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधताना, राज्यात आम्ही कोरोनमुक्त गावांसाठी स्पर्धा आयोजित करून एक चांगली वातावरण निर्मिती केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती देताना सांगितले. लहान मुलांमधील कोविड रोखण्यासाठी टास्क फोर्स निर्माण केल्याचेही ते म्हणाले.

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून ८ ते १० जिल्ह्यांमध्ये अद्यापही संसर्ग आहे. या जिल्ह्यांमधील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी जणांना पूर्ण दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या ८७.९० लाख डोसेस इथे दिल्या आहेत. त्यामुळे जादाचे ३ कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. याचसोबत राज्याला आवश्यक असलेल्या अतिरीक्त २ हजार मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा बाजूच्या राज्यातून झाल्यास मदत होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. भिलाई, जामनगर, बेल्लारी स्टील प्लांट या ठिकाणाहून एलएमओ महाराष्ट्राला मिळण्यासाठी केंद्राने सहाय्य करावे अशी मागणी ठाकरेंनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT