नागपूर : घरगुती लग्नसोहळ्यांनाही लागणार प्रशासनाची परवानगी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विदर्भात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांसाठी निर्बंध कडक केले आहेत. गुरुवारी शहरात १ हजार ७० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर ८ जणांनी आपले प्राण गमावले. खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने मंगल कार्यालयं, लॉन मध्ये विवाहसोहळा आणि इतर घरगुती समारंभ आयोजित करण्यासाठी परवानगी नाकारली. परंतू यापुढे नागपुरात घरगुती लग्नसोहळ्यासाठीही प्रशासनाची परवानगी असणं आवश्यक असणार आहे.

पंढरपूर : JCB मधून मिरवणूक, ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर शहर वगळता इतर भागांत हे नियम लागू असणार आहेत. त्यामुळे यापुढे नागपूरच्या ग्रामीण भागात जर एखाद्या व्यक्तीला घरात लग्नसोहळा आयोजित करायचा असेल तर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. मंगल कार्यालयं आणि लॉनमध्ये विवाहसोहळ्यांना परवानगी नाकारण्यात आल्यानंतर काही ठिकाणी घरगुती विवाहसोहळ्यांनाही गर्दी वाढण्याचे प्रकार समोर यायला लागले. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. परवानगी न घेता आयोजित करण्यात आलेल्या लग्नसोहळ्यांवर कारवाई केली जाईल असही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पत्रिकेत मंगळ असणं हे घटस्फोटाचं कारण ठरु शकत नाही – हायकोर्ट

नागपुरात गुरुवारी ८ जणांना कोरोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले. वाढती रुग्णसंख्या पाहता नागपूर जिल्हा परिषदेने १२ मार्चपर्यंत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केला आहे. जिल्हा परिषदेच्या १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

नागपूर : रुग्णवाढीचा आलेख चढताच, १ हजाराहुन अधिकांना कोरोनाची लागण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT