Infosys चे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांच्यावर SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा; कुणी केले आरोप?
इन्फोसिसची स्थापना जुलै 1981 मध्ये सात अभियंत्यांनी केली होती. ज्यामध्ये नारायण मूर्ती, क्रिस गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी, एसडी शिबुलाल, के दिनेश, एनएस राघवन आणि अशोक अरोरा यांचा समावेश होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जातीवाचक शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप

Infosys चे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांच्यावर गुन्हा दाखल
इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि भारतीय विज्ञान संस्थेचे (IISC) माजी संचालक बलराम आणि इतर 16 जणांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या (CCH) निर्देशानुसार सदाशिव नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीटीआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका फॅकल्टी सदस्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिस गोपालकृष्णन हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत.
तक्रारदार दुर्गाप्पा हे बोवी आदिवासी समुदायाचे आहेत. आयआयएससीच्या सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी मेंबर असलेले दुर्गाप्पा यांनी आरोप केला की, त्यांना 2014 मध्ये हनी ट्रॅप प्रकरणात गुंतवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलं. दुर्गाप्पा यांनी असा आरोप केला की, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संध्या विश्वेश्वरय्या, हरी केव्हीएस, दासप्पा, बलराम पी, हेमलता मिशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावरकर आणि मनोहरन यांचा समावेश आहे.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : सैफच्या केसमध्ये पकडलेल्या आरोपीचे ठसे मॅच होईना? फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...
इन्फोसिसची स्थापना जुलै 1981 मध्ये सात अभियंत्यांनी केली होती. ज्यामध्ये नारायण मूर्ती, क्रिस गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी, एसडी शिबुलाल, के दिनेश, एनएस राघवन आणि अशोक अरोरा यांचा समावेश होता. इन्फोसिसची स्थापना पुण्यात झाली होती, मात्र कंपनीचं मुख्यालय सध्या बंगळुरूमध्ये आहे. गोपालकृष्णन यांनी 2007 ते 2011 पर्यंत इन्फोसिसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलं.
हे ही वाचा >> Baba Siddique: 'हत्येच्या दिवशी वडिलांनी डायरीत BJP नेत्याचे नाव लिहिलेलं...', झिशान सिद्दीकींचा पोलिसात जबाब
क्रिस गोपालकृष्णन यांनी 2011 ते 2014 पर्यंत कंपनीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. कृष्णन 2014 मध्ये कंपनीतून निवृत्त झाले आणि निवृत्तीनंतर त्यांनी त्यांच्या बिझनेस इनक्यूबेटर अॅक्सिलॉर व्हेंचर्स आणि काही व्हेंचर फंड्सद्वारे अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. जानेवारी 2011 मध्ये, भारत सरकारने गोपालकृष्णन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. क्रिस गोपालकृष्णन यांची अंदाजे एकूण संपत्ती ₹38,5000 कोटी आहे.