Devendra Fadnavis : सैफच्या केसमध्ये पकडलेल्या आरोपीचे ठसे मॅच होईना? फडणवीसांचं उत्तर, म्हणाले भ्रम पसरवू नका...
पोलिसांनी न दिलेली माहिती सांगून माध्यमांनी गोंधळ निर्माण करू नये. तसंच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती माध्यमांना देण्यास सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सैफ अली खान प्रकरणातील आरोपीचे ठसे जुळेना?

घरात सापडलेले ठसे आरोपींच्या बोटाच्या ठशांशी जुळत नसल्याची माहिती खोटी?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis on Saif Ali Khan Case : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचं प्रकरण सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी न सांगितलेल्या गोष्टी सांगून माध्यमांनी गोंधळ निर्माण करू नये. तसंच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती माध्यमांना देण्यास सांगितले.
"भ्रम पसरवू नका"
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी हे स्पष्टपणे सांगतोय, ज्या गोष्टींची खात्री झालेली नाही आणि ज्या पोलिसांनी सांगितल्याच नाहीत अशा गोष्टी लिहून किंवा दाखवून गोंधळ निर्माण करणं योग्य नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की, पोलीस या प्रकरणाचा तपास खूप चांगल्या प्रकारे करत आहेत.
हे ही वाचा >> Anjali Damania : "धनंजय मुंडेंचा राजीनामा...", अजित पवार यांच्या भेटीनंतर दमानिया काय म्हणाल्या?
फडणवीस पुढे म्हणाले, 'जवळजवळ सर्व गोष्टी पोलिसांना सापडल्या आहेत.' आता पोलीस ते तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचतील. मी मुंबई आयुक्तांना आज किंवा उद्या कधीतरी तुमच्या माहितीसाठी केसची योग्य माहिती देण्यास सांगेन असंही फडणवीस म्हणाले.
"मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर"
हे ही वाचा >> Chandrapur : चंद्रपुरात कुख्यात शिकारी अजित राजगोंड पुन्हा वन विभागाच्या ताब्यात, मोठं सिंडीकेट उघड होणार?
काही दिवसांपूर्वी, आज तकला दिलेल्या विशेष मुलाखती, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईत जेव्हा बॉलिवूड स्टार्सही सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य माणसाचं काय? असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमच्यासाठी बॉलिवूड स्टार आणि सामान्य लोक सारखेच आहेत.'