मोठी बातमी! पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांना CID ने केली अटक

सौरभ वक्तानिया

भाईंदर येथील बिल्डर शामसुंदर अग्रवालकडून कोट्यवधींची रोकड आणि स्थावर मालमत्ता बळकावल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी आज मोठी कारवाई करत पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरे या दोघांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाईंदर येथील बिल्डर शामसुंदर अग्रवालकडून कोट्यवधींची रोकड आणि स्थावर मालमत्ता बळकावल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी आज मोठी कारवाई करत पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरे या दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणातील सहआरोपी आणि परमबीर सिंग यांचा निकटवर्तीय संजय पुनमिया याने राज्य सरकारमधील बड्या मंत्र्याच्या मागे तपास यंत्रणांची चौकशी आणि सरकार पाडण्याचा कट रचल्याचा तसंच परमबीर यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा तक्रारदाराचा दावा केला आहे. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी हा सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे दिलं आहे.

मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने अग्रवाल याच्या तक्रारीनुसार 21 जुलैला परमबीर यांचे निकटवर्तीय पुनामिया, सुनील जैन, उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, वरिष्ठ निरीक्षक आशा कोकरे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयुक्त हेमंत नगराळे यांनी एसआयटी स्थापन केली होती. उपायुक्त निमित्त गोयल यांच्या नेतृत्वाखाली आणि तपास अधिकारी एम. एम. मुजावर यांच्यासह सात अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. मात्र हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं असल्याने आणि यामध्ये राजकीय तसंच अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या ते सीआयडीकडे देण्यात आलं. त्यानंतर आता सीआयडीने ही कारवाई केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp