दिल्लीत इंटरनेट, मेट्रो, टेलिकॉम सर्व्हिसेस बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: मंगळवारी दिल्ली ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढला. त्यानंतर गृह मंत्रालयाने नोयडा आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट, काही मेट्रो मार्ग, टेलिकॉम सर्व्हिसेस सह इंडिया गेटकडे जाणारे मार्ग बंद केले. तसंच पंतप्रधानांसह इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.

ADVERTISEMENT

दिल्लीतील हिंसक आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढला. तणाव वाढल्यानंतर दिल्लीकडे आणखी काही ट्रॅक्टर येत असल्याची एक बातमी आली. या आंदोलनाला आणखी हिंसक वळण लागू नये यासाठी दिल्ली प्रशासनाने नोयडा, गाझीपूर, टीकरीबॉर्डर, मुखर्बा चौक, नाग्लोई या भागांमध्ये इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली. याव्यतिरिक्त ८ मार्गांवरील मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले.

ज्यामध्ये व्दारका – नजफगड, जामा मस्जिद मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. तसंच इंडिया गेटकडे जाणारे मार्ग बंद केले. मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत या सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधानांचे निवावसस्थान आणि राष्ट्रपतीभवन येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसंच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT