आधी शाहरुख नंतर आर्यन, ‘वानखेडे’ नावाचा पिता-पुत्रांना जबर दणका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL च्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफ शर्यत अतिशय रंगतदार झालेली असतानाच शनिवार-रविवारी मुंबईकरांना क्रिकेटव्यतिरीक्त आणखी एक ड्रामा पहायला मिळाला. शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूजवर NCB ने छापेमारी करत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर कारवाई केली. NCB चे झोनल डिरेक्टर आणि मराठमोळे दबंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानने आपलं पठाण सिनेमाचं शुटींग पुढे ढकललं आहे. मुलाला अटक झाल्यानंतर शाहरुख सातत्याने NCB च्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. परंतू NCB या कारवाईनंतर खान पिता-पुत्रांच्या आयुष्यात वानखेडे या नावामुळे एक अजब-गजब योगायोग जुळून आला आहे.

Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ला अटक, रेव्ह पार्टीत होता सामील

हे वाचलं का?

वानखेडे मैदानावर शाहरुखचा राडा, घालण्यात आली होती बंदी –

शाहरुख खानकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाची सहमालकी आहे. आयपीएल २०१२ दरम्यान सामना संपल्यानंतर शाहरुख खानचा वानखेडे मैदानावरच्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला होता. MCA ने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार हा वाद झाला त्यावेळी शाहरुख दारुच्या नशेत होता आणि त्याने MCA च्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली.

ADVERTISEMENT

या प्रकारानंतर शाहरुख खानने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, MCA चा सदर कर्मचारी आपल्या मुलीसोबत चुकीच्या पद्धतीने वागत होता. KKR च्या सेलिब्रेशनदरम्यान हा वाद घडला होता. त्यावेळी एका बापाला जे करणं गरजेचं होतं तेच मी केलं असं स्पष्टीकरण शाहरुखने दिलं. MCA च्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखने त्या प्रसंगादरम्यान शिवीगाळ केल्यामुळे हा वाद वाढला.

ADVERTISEMENT

‘तो ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो’, आर्यनबद्दल शाहरुखचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रसारमाध्यमांमध्ये हे प्रकरण आल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाहरुखविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ज्यानंतर MCA ने शाहरुखवर कारवाई करत त्याला वानखेडे मैदानात प्रवेश करण्यासाठी ५ वर्षांची बंदी घातली. या प्रकरणातून आपलं नाव क्लिअर करण्यासाठी शाहरुखला किमान एक दशकाची वाट पहावी लागली.

क्रूज ड्रग्ज पार्टी : शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले

वानखेडेंचा आर्यन खानलाही दणका –

बॉलिवूडमध्ये आपल्या खास स्टाईलसाठी आणि पार्ट्यांसाठी ओळखला जाणारा शाहरुख खान आपल्या मुलांबद्दल भावूक आहे. आर्यन खान हा शाहरुखचा मुलगा असला तरीही तो कधीही फारसा प्रसिद्धीच्या झोतात आलेला नाही. आतापर्यंत आर्यनने आपलं आयुष्य हे आपल्यापुरती मर्यादीत ठेवलं होतं.

आर्यन खानच्या अटकेनंतर NCB चे ‘सिंघम’ समीर वानखेडे पुन्हा चर्चेत, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी आहे खास नातं

परंतू शनिवारी रात्री NCB च्या समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाईत आर्यन खान सापडला आणि खान परिवाराचा एक विचीत्र योगायोग जुळून आला. आर्यन खानसह ७-८ जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत आर्यनने आपल्याला त्या पार्टीत गेस्ट म्हणून बोलावल्याचं सांगितलं. चौकशीनंतर आर्यनला NCB ने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT