पत्नीसोबतचा फोटो पोस्ट केल्यामुळे इरफान पठाण होतोय ट्रोल, जाणून घ्या कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. निवृत्तीनंतर इरफान सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो, अनेकदा इरफान आपल्या पत्नीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. परंतू या फोटोंमध्ये इरफानच्या पत्नीच्या चेहऱ्यावर मुखवटा असायचा. काही दिवसांपूर्वी इरफानच्या मुलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला, ज्यात इरफानच्या पत्नीचा फोटो हा ब्लर केलेला होता.

यानंतर इरफान पठाणला सोशल मीडियावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रीयांचा सामना करावा लागला. अनेकांनी या फोटोवरुन इरफानवर बरीच टीकाही केली. अखेरीस इरफानने यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या मुलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला फोटो आपल्या ट्विटरवर टाकत इरफानने टीकाकारांना उत्तर दिलंय. “हा फोटो माझ्या पत्नीने माझ्या मुलाच्या अकाऊंटवरुन शेअर केलाय. या फोटोवर आमच्यासाठी खूप वाईट प्रतिक्रीया येत आहेत. तिने हा फोटो स्वखुशीने ब्लर केला आहे. मी तिचा मालक नाही, जोडीदार आहे. तिचं आयुष्य तिची इच्छा.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इरफान आणि सफा बेग यांचा २०१६ साली विवाहसोहळा पार पडला. सफा बेग ही प्रसिद्ध मॉडेल आहे. सफा बेगचे वडील मिर्झा फारुख बेग हे सौदी अरेबियातले प्रसिद्ध उद्योजग आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT