Yogesh Kadam: ‘हा अपघात नव्हता, माझ्या..’, रामदास कदमांच्या मुलाचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MLA Yogesh Kadam Reaction on Accident: मुंबई: बाळासाहेबांची शिवसेना नेते पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री रामदास कदमांचे (Ramdas Kadam) पुत्र योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या कारला काल (6 जानेवारी) रात्री अपघात (Car Accident) झाल्यानंतर आता त्यांनी याप्रकरणी घातापाताची (attempt to murder) शंका व्यक्त केली आहे. हा नेमका अपघातच होता का याबाबत त्यांना शंका असून त्यांनी याबाबत पोलिसांनाही काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच या अपघाताची चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही करणार असल्याचं योगेश कदम म्हणाले आहेत. (it was not an accident, there is a possibility of attempt to murder Ramdas kadams son mla yogesh kadam expressed doubt)

ADVERTISEMENT

योगेश कदम यांच्या कारचा पोलादपूरनजीक अत्यंत भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण याच अपघाताबाबत टीव्ही नाइन या वृत्तवाहिनीशी बोलताना योगेश कदम यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे. पाहा योगेश कदम नेमकं काय म्हणाले.

रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात

हे वाचलं का?

’12 टायरचा डंपर 100-125 च्या स्पीडने धडकला, हा अपघात नव्हता’, योगेश कदमांनी व्यक्त केली घातापाताची शंका.

‘अपघाताचा जो पॅटर्न आहे तो नॉर्मल अपघातासारखा वाटत नाहीए. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे जी सूचना किंवा जी माहिती द्यायची आहे ती सर्व कालच दिली आहे. पोलीस यंत्रणा व्यवस्थित माहिती घेऊन चौकशी करतील आणि रायगड जिल्ह्याच्या एसपींशी देखील माझं बोलणं झालं आहे.चौकशी करणारे जे काही अधिकारी आहेत माझ्याकडून जी माहिती द्यायची, ज्या शंका मला होत्या. त्या सगळ्या गोष्टी मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत.’

ADVERTISEMENT

‘जो पॅटर्न आहे तो पॅटर्न हा नॉर्मल अपघातासारखा वाटत नाही. कारण माझ्या मागे आणि पुढे दोन्हीकडे पोलिसांची गाडी असताना देखील मध्ये येऊन माझ्या गाडीला एवढ्या जोरात धडक देणं. जे खरं तर अपघात स्थळ नव्हतं. ते पण मोठा डंपर.. 12 टायरचा डंपर होता. पूर्णपणे कोळशाने भरलेला डंपर होता.’

ADVERTISEMENT

खड्डा, वेग, डुलकी… ऋषभ पंतचा अपघात कशामुळे? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

‘जवळपास तीन-साडे तीन टन माल भरलेला असताना तो डंपर फुल स्पीडमध्ये होता. जवळ-जवळ 100-125 चा स्पीड होता. अशावेळी आपण माझ्या गाडीची अवस्था बघितली अशावेळी कुठे तरी शंका येते.’

‘अपघाताचा पॅटर्न नॉर्मल दिसल्याने नक्कीच घातपात आहे की नाही याची खात्री करुन घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे सखोल चौकशीची मी मागणी करणार आहे.’

‘मात्र, पोलिसांनी त्यांचं काम सुरु केलं आहे. त्यामुळे जे काही सत्य आहे ते समोर येईल.’ असं म्हणत योगेश कदम यांनी अपघाताची चौकशी सुरु असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या सगळ्या प्रकाराबाबत रामदास कदम काय बोलणार किंवा कोणावर थेट आरोप करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT