RSS headquarters : संघ मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या नागपूर युनिटने एक महत्वाची कारवाई केली आहे. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी अखेरीस एटीएसच्या ताब्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या रईस अहमद असदउल्लाह शेख या दहशतवाद्याला नागपूर एटीएस पथकाने ताब्यात घेतलं आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस अहमदचा ताबा नागपूर एटीएसने प्रोडक्शन वॉरंटवर घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रईस अहमद शेखने गेल्या वर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन डॉ. हेगडेवार स्मृती भवन परिसर आणि इतर महत्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. ही बाब समोर येताच नागपूर पोलिसांना संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली होती. तसेच हेगडेवार स्मृती भवन परिसरात ड्रोन्सनाही बंदी घातली होती.

हे वाचलं का?

या घटनेनंतर रईस अहमद शेखचा शोध घेण्यात येत होता. अखेरीस जम्मू-काश्मीरमधून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत रईसने पाकिस्तानमधील जैश च्या हँडलरच्या सांगण्यावरुन संघ मुख्यालयाची रेकी केल्याचं मान्य केल्याचं कळतंय. नागपूर एटीएसच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रईसची जम्मू-काश्मीरमध्ये चौकशी केल्याचं कळतंय. यापुढील तपासासाठी एटीएसने रईसचा ताबा घेतला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय हे नेहमी अतिरेक्यांच्या निशाण्यावर राहिलेलं आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांची कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते. त्यामुळे रईसच्या चौकशीतून आणखी कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT