बुरखा-हिजाबला माझा विरोधच, पण…कर्नाटकातील वादावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रीया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कर्नाटकातील हिजाब प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. हिजाब घालण्यासाठी शाळेने परवानगी नाकारल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर कर्नाटक सरकारने तीन दिवस शाळा-कॉलेजं बंद ठेवल्या. कर्नाटक हायकोर्टात मुख्य न्यायाधिशांच्या उपस्थितीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. हा वाद वाढल्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रीया यायलाही सुरुवात झाली आहे.

ADVERTISEMENT

गीतकार आणि माजी राज्यसभा खासदार जावेद अख्तर यांनी हिजाब वादावर आपली महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे. “बुरखा आणि हिजाब परिधान करण्याला माझा आधीही विरोध होता आणि आजही आहे. पण कर्नाटकात लहान मुलींना ज्या प्रकारे धमकावलं जातंय ते संतापजनक आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही”, असं जावेद अख्तर म्हणालेत.

भाजप खासदार हेमा मालिनी यांनीही कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया आहे. “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. त्या एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होत्या.

हे वाचलं का?

Karnataka Hijab Row: हिजाब किंवा भगवी शाल परिधान करण्यास बंदी आहे की नाही?
पाहा संविधानात काय म्हटलंय?

जावेद अख्तर हे अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत मांडत असतात. अनेकदा जावेद अख्तरांनी केलेल्या विधानामुळे वाद रंगले आहेत. राज्यसभेत खासदार राहिलेल्या अख्तर यांचं याविषयी काय मत आहे याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT