‘साप चावल्याप्रमाणे…’, जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीसांवर पहिला ‘वार’
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनामुळे जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. दरम्यान, निलंबनानंतर जयंत पाटलांनी विधिमंडळाबाहेरून पहिला हल्ला थेट शिंदे फडणवीसांवर केलाय. जयंत पाटलांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागलीये. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून गुरूवारी विधानसभेत प्रचंड राडा झाला. […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनामुळे जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. दरम्यान, निलंबनानंतर जयंत पाटलांनी विधिमंडळाबाहेरून पहिला हल्ला थेट शिंदे फडणवीसांवर केलाय. जयंत पाटलांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागलीये.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून गुरूवारी विधानसभेत प्रचंड राडा झाला. या गदारोळात जयंत पाटलांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला. त्यावर बोट ठेवत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली आणि तसा ठराव मंजूर करून हिवाळी अधिवेशनापुरतं निलंबन करण्यात आलं.
निलंबनाच्या कारवाईनंतर जयंत पाटील सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाले असून, आज (23 डिसेंबर) पहिला वार जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
अजित पवारांवर महाविकास आघाडीचे आमदार नाराज? नरमाईच्या भूमिकेवर आक्षेप
