‘एक घाव, दोन तुकडे केले नसते, तर…’; संतोष बांगर हल्ला करणाऱ्यांवर भडकले, सांगितलं काय घडलं?
– ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी घडला. या घटनेनंतर आमदार संतोष बांगरांनी गाडीवर चालून आलेल्यांना चिवसैनिक असं हिणवत प्रत्युत्तर दिलंय. ‘मुंबई Tak’शी बोलताना बांगरांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दरम्यान, या घटनेनंतर संतोष बांगरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फोन केला होता. […]
ADVERTISEMENT

– ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली
उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी घडला. या घटनेनंतर आमदार संतोष बांगरांनी गाडीवर चालून आलेल्यांना चिवसैनिक असं हिणवत प्रत्युत्तर दिलंय. ‘मुंबई Tak’शी बोलताना बांगरांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दरम्यान, या घटनेनंतर संतोष बांगरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फोन केला होता.
शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर टीका करणारे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीच शिंदे गटाला जाऊन मिळाले. तेव्हापासून संतोष बांगर चर्चेत आहेत. संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, कारण ठरलंय अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी येथे झालेला हल्ला.
या घटनेवर आता संतोष बांगरांनी भूमिका मांडलीये. घटनाक्रम सांगतानाच संतोष बांगरांनी हल्ला करणाऱ्यांना आव्हानही दिलंय. पत्नी आणि बहीण नसती, तर एक घाव, दोन तुकडे केले असते, असं विधान बांगरांनी घटनेनंतर केलंय.










