बॉलिवूडचे ठेकेदार लपून बसलेत; करण जोहर आणि आदित्य चोप्रावर कंगनाचा निशाणा
देशात कोरोनाच्या रूग्णसंख्या वाढतेय आणि याचा परिणाम बॉलिवूडच्या सिनमांवरही पहायला मिळतोय. अनेक सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र अभिनेत्री कंगना राणौतचा ‘थलायवी’ सिनेमा ठरलेल्या दिवशीच रिलीज होणार आहे. खुद्द कंगनाने यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली असून यावेळी तिने दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्यावरही निशाणा साधला आहे. They did everything to throw me […]
ADVERTISEMENT
देशात कोरोनाच्या रूग्णसंख्या वाढतेय आणि याचा परिणाम बॉलिवूडच्या सिनमांवरही पहायला मिळतोय. अनेक सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र अभिनेत्री कंगना राणौतचा ‘थलायवी’ सिनेमा ठरलेल्या दिवशीच रिलीज होणार आहे. खुद्द कंगनाने यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली असून यावेळी तिने दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्यावरही निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
They did everything to throw me out of the industry,ganged up, harassed me today Bollywood ke thekedaars Karan Johar and Aadiya Chopra are hiding, all big heroes are hiding but Kangana Ranaut with her team coming with 100cr budget film to save Bollywood (cont) https://t.co/LBU4UcUNRJ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 31, 2021
तरन आदर्श यांनी ‘थलायवी’ सिनेमाच्या रिलीजबाबत ट्विट केलं होतं. या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणाली, “त्यांनी मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक प्रकारचे प्रयत्न केले. सर्वांनी मला एकत्र येऊन त्रास दिला. मात्र आज बॉलिवूडचे हे ठेकेदार करण जोहर आणि आदित्य चोप्रा लपून बसलेत. त्याचप्रमाणे सगळे मोठे हिरो आज लपून बसले आहेत. परंतु कंगना तिच्या टीमसोबत 100 कोटी बजेटच्या सिनेमासोबत बॉलिवूडला वाचवण्यासाठी येतेय.”
हे वाचलं का?
कंगना तिच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणते, “इतिहासात सुवर्ण अक्षरात ही नोंद होईल की बाहेरून आलेली, सावत्रपणाची वागणूक मिळालेल्या एका व्यक्तीनेच वाचवलं. आपण सांगू शकत नाही आयुष्य आपल्याला कोणत्या वळणावर नेऊन पोहोचवेल. लक्षात ठेवा बॉलिवूडची ही चिल्लर पार्टी आईविरोधात एकत्र येऊ शकत नाही कारण आई ही शेवटी आई असते.”
‘थलायवी’साठी कंगनाने वाढवलं होतं 20 किलो वजन; फोटो झाले व्हायरल
ADVERTISEMENT
उद्या म्हणजेच 2 एप्रिल रोजी थलायवी सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात येणार आहे. तर थलायवी हा सिनेमा 23 एप्रिल रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू अशा 3 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT