कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणींचा ‘या’ दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश, तारीखही ठरली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. याशिवाय गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणीही (Jignesh Mevani) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, कन्हैया कुमार 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. तर जिग्नेश हे देखील त्याच दिवशी पक्षात सामील होऊ शकतात. जर या दिवशीचा मुहूर्त हुकला तर 2 ऑक्टोबरला ते काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. दोन्ही नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश मेवाणी हे देखील लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल देखील यांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. जिग्नेश मेवाणी हे 28 सप्टेंबर किंवा 2 ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, पक्षाने कन्हैया कुमार यांना बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळेसच सोबत येण्याची ऑफर दिली होती. पण तेव्हा ते शक्य झालं नव्हतं.

बेगूसराय मतदारसंघातून निवडणुकीत झाला होता कन्हैय्या कुमार यांचा पराभव

हे वाचलं का?

कन्हैया कुमार यांनी मागील लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र, बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या कन्हैया यांचा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पराभव केला होता. दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या वादग्रस्त घोषणाबाजीनंतर कन्हैया कुमार प्रकाशझोतात आले होते. त्यावेळी ते जेएनयूएसयूचे अध्यक्ष होते. तेव्हापासून कन्हैया कुमार सतत चर्चेत राहिले आहेत. त्यांनी आतापर्यंत सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

तरुण चेहऱ्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस तरुण चेहऱ्यांना त्यांच्याशी जोडण्याच्या आता जोरदार प्रयत्न करत आहेत. व्हर्चुअल मीटिंगदरम्यान, राहुल गांधी म्हणाले होते की, ‘पक्षाला अशा नेत्यांची गरज आहे की, जे निडर असतील. असे नेते जे बाहेर आहेत, त्यांना काँग्रेसमध्ये आणा आणि ज्यांना पक्षात भीती वाटते ते आरएसएसचे आहेत, त्यांना पक्षातून बाहेर काढा.’

ADVERTISEMENT

Congress पक्ष नव्या उभारीसाठी आता कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणींसारख्या तरूण तुर्कांच्या शोधात!

भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा नवा गेम प्लॅन

बिहार आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचं जे गणित बिघडलं त्यानंतर काँग्रेस पक्ष नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसला आता तरूण चेहरा हवा आहे. तरूण चेहरा जो त्यांच्या पक्षाला नवी उभारी देऊ शकतो. अलिकडेच सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांसारख्या काँग्रेसच्या युवा चेहऱ्यांनी काँग्रेसला हात दाखवला. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष नव्या चेहऱ्यांना आपल्या पक्षात स्थान दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT