बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या : कर्नाटकातील शिमोगात प्रचंड तणाव, पोलिसांकडून गोळीबार
हिजाबचा वाद शांत होत असताना कर्नाटकातील शिमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्यामुळे हिसेंची ठिणगी पडली आहे. कर्नाटकातील शिमोगामध्ये घडलेल्या या हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू असून, शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. घटनेनंतर काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. दरम्यान, शहरातील सिद्दैया रोड परिसरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने शहरातील शाळा-महाविद्यालयांना […]
ADVERTISEMENT
हिजाबचा वाद शांत होत असताना कर्नाटकातील शिमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्यामुळे हिसेंची ठिणगी पडली आहे. कर्नाटकातील शिमोगामध्ये घडलेल्या या हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू असून, शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. घटनेनंतर काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. दरम्यान, शहरातील सिद्दैया रोड परिसरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने शहरातील शाळा-महाविद्यालयांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हिजाब वाद चिघळल्यानं कर्नाटकातील शिमोगामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती सुरळीत होत असतानाच रविवारी रात्री बजरंग दलात कार्यरत असलेल्या हर्षा नावाच्या २३ वर्षीय तरुणाची निघृर्ण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. रविवारी (२० फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. शहरातील भारती कॉलनीमध्ये काही अज्ञात लोकांनी बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या हर्षावर चाकू हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांमध्ये चार ते पाच तरुणांचा समावेश असावा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
या प्राणघातक हल्ल्यात हर्षा गंभीर जखमी झाला. त्याला काही जणांनी रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. हत्येचं वृत्त परिसरात आणि शहरात पसरल्यानंतर तणावपूर्ण
वातावरण निर्माण झालं आहे. घटनेच्या काही तासानंतर शिवमोगातील सिगेहट्टी परिसरात काही लोकांच्या जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. त्याचबरोबर भडकलेल्या जमावाने अनेक वाहनं पेटवून देत जाळपोळ केली. त्याचबरोबर शहरातील सिद्दैया रोड परिसरातही जमाव रस्त्यावर आला होता. मात्र, पोलिसांनी हवेत गोळीबार करत जमावाला पांगवलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याची मागणी
हर्षा हत्या प्रकरणात पोलिसांनी दिवसभरात तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू असतानाच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी आज करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिलं आहे.
हिंसक घटनांनंतर शिमोगामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तसेच यापूर्वी शिमोगात काम केलेल्या राज्यातील ११२ पोलीस निरीक्षकांना आणि उपनिरीक्षकांना शहरात पाचारण करण्यात आलं आहे. पोलीस दलाबरोबरच आरएएफ जवानही तैनात करण्यात आले आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेचा निषेध करत नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर भाजपचे नेते सुनील देवधर यांनीही घटनेचा निषेध केला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. हिंदू युवक हर्षाच्या निर्घृण हत्येचा मी तीव्र निषेध करतो असं देवधर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT