मॉर्निंग वॉकला कुठे जाता हे माहिती आहे! हिजाब वादावर निर्णय सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमकी
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात गाजत असलेल्या हिजाब वादावर उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला. ज्यात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितूराज अवस्थी यांच्यासह दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मुस्लीम विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर रितूराज अवस्थी यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रितूराज अवस्थी यांना जिवे मारण्याची […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात गाजत असलेल्या हिजाब वादावर उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला. ज्यात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितूराज अवस्थी यांच्यासह दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मुस्लीम विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर रितूराज अवस्थी यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
तामिळनाडूमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रितूराज अवस्थी यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. कर्नाटकातील वकील एस. उमापथी यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ उच्च न्यायालयाच्या रजिस्टारला ही बाब लक्षात आणून दिली. ज्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणात तात्काळ दखल घेत मुख्य न्यायाधीश अवस्थी यांच्यासह इतर दोन न्यायाधीशांना Y दर्जाची सुरक्षाव्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे.
वकील उमापथी यांना हा धमकीचा व्हिडीओ What’s App वर मिळाला. ज्यात आरोपी खुलेआम मुख्य न्यायाधीश अवस्थी यांना धमकी देताना दिसत आहे. झारखंडमध्ये एका न्यायाधीशाची मॉर्निंग वॉकला जाताना हत्या करण्यात आली होती, या घटनेचा उल्लेखही आरोपीने व्हिडीओत केल्याचं उमापथी यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
तुम्ही मॉर्निंग वॉकला कुठे जाता हे लोकांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या परिवारासोबत उडीपी मठात गेला होतात असं म्हणत या आरोपीने अवस्थी यांनी दिलेल्या निकालाबाबत अश्लील शब्दांमध्ये टीका केली आहे.
karnataka hijab row verdict : हिजाब इस्लामचा अनिवार्य भाग नाही; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
ADVERTISEMENT
तामिळनाडूच्या मदुराई येथे हा व्हिडीओ तयार झाला असून कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणात तामिळनाडू पोलिसांशी संपर्क साधत या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितूराज अवस्थी, कृष्णा दीक्षित आणि काझी एम. जैबुन्निसा यांनी हिजाबवादावर निकाल देत याचिका फेटाळून लावली होती.
ADVERTISEMENT
हिजाब घालणं ही इस्लाममधील गरजेची आणि महत्वाची प्रथा नसल्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालता येणार नाही असा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT