Katrina Kaif wedding Ring: कतरिनाची एंगेजमेंट रिंग… मग चर्चा तर होणारच!, पण नेमकी किंमत किती?
जयपूर: शेवटी ती वेळ आली ज्याची सर्वजण वाट पाहत होते. कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अखेर लग्न बंधनात अडकलेच.. केसात गजरा, हातात चुडा चढवलेली कतरिना कैफ ही एखाद्या राणी इतकीच आपल्या लग्नासाठी नटली-थटली होती. या खास दिवशी कतरिनाने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्याचवेळी विकी कौशल देखील ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये खूपच मस्त […]
ADVERTISEMENT
जयपूर: शेवटी ती वेळ आली ज्याची सर्वजण वाट पाहत होते. कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अखेर लग्न बंधनात अडकलेच.. केसात गजरा, हातात चुडा चढवलेली कतरिना कैफ ही एखाद्या राणी इतकीच आपल्या लग्नासाठी नटली-थटली होती. या खास दिवशी कतरिनाने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्याचवेळी विकी कौशल देखील ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये खूपच मस्त दिसत होता. मात्र या सगळ्यात आता कतरिनाच्या निळ्या-डायमंडची एंगेजमेंट रिंगची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण कतरिनाने परिधान केलेली ही रिंग प्रचंड महाग असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
कतरिनाची एंगेजमेंट रिंग
कतरिना आणि विकी यांनी आपलं रिलेशन अगदी गुपित ठेवलं होतं. या दोघांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. पण तरीही ते त्यांनी कधीच आपल्या प्रेमाचं प्रदर्शन केलं नाही. काही दिवसांपूर्वी कतरिनाच्या एंगेजमेंटच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र तिने त्याचा इन्कार केला होता. पण आता कतरिना आणि विकी हे थेट लग्नाच्या बेडीत अडकले आहे. अशावेळी कतरिनाच्या हातात एंगेजमेंट रिंगही पाहायला मिळत आहे.
हे वाचलं का?
मेहंदीने सजवलेल्या सुंदर हातात कतरिनाची ब्लू-डायमंड प्लॅटिनम एंगेजमेंट रिंग ही सर्वात उठून दिसत आहे. चारी बाजूंनी हिऱ्यांनी सजलेल्या कतरिनाच्या एंगेजमेंट रिंगमध्ये मध्यभागी टिफनी सॉलेटेअर देखील आहे. या टिफनी सॉलेटेअर एंगेजमेंट रिंगची किंमत सुमारे 7,40,708 लाख रुपये एवढी आहे.
ADVERTISEMENT
त्याच वेळी, विकी कौशलची एंगेजमेंट रिंग देखील प्लॅटिनम आहे. मात्र, त्यात हिरा नाही. लग्नाच्या फोटोंमध्ये कतरिनाची प्रचंड महाग असलेली ही रिंग पाहायला मिळत आहे. दरम्यान, या लग्न सोहळ्यात बॉलिवूडच्या सर्वात सुंदर जोडप्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद पाहायला मिळत होता.
ADVERTISEMENT
vickatwedding: Katrina Kaif झाली वधू… केसात गजरा, हातात चुडा.., ‘मिसेस कौशल’ची पहिली झलक
कतरिना-विकीचं ग्रँड वेडिंग
कतरिना-विक्कीच्या ग्रॅण्ड वेडिंगची अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यांचा शाही विवाह अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे पारंपारिक विधी पार पाडत हा लग्न सोहळा संपन्न झाला. अतिशय शाही पद्धतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कतरिनाचे रॉयल वेडिंग सर्वांसाठी संस्मरणीय ठरले आहे. जेव्हा-जेव्हा बॉलिवूडच्या रॉयल वेडिंगचा उल्लेख होईल तेव्हा-तेव्हा त्यांच्या लग्नाचा नक्कीच चर्चा होईल.
कतरिना आणि विकीने त्यांच्या ग्रॅंड वेडिंगसाठी अगदी मोजक्याच लोकांना बोलावलं होतं. दरम्यान, यावेळी लग्नाला काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. या लग्नाला फक्त 120 लोक उपस्थित होते. मात्र, कतरिनाने तिचे जवळचे मित्र सलमान आणि अक्षय यांना लग्नासाठी आमंत्रित केलं नव्हतं. कतरिनाच्या लग्नात सलमान नसल्याने चाहते थोडे निराश झाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT