कडोंमपा निवडणूक: सावरकरांच्या नावाचा वॉर्ड वगळून सेनेचा विद्यमान आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– मिथीलेश गुप्ता, डोंबिवली प्रतिनीधी

ADVERTISEMENT

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर आता मनसेपाठोपाठ भाजपनेही टीका केली आहे. शिवसेनेने या प्रभाग रचनेत विद्यामान भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या वॉर्डातून रविंद्र चव्हाण पहिल्यांदा नगरसेवर म्हणून निवडून आले तो स्वातंत्र्यवीर सावरकर वॉर्ड यंदाच्या प्रभागरचनेत वगळण्यात आला आहे.

२००५ साली रविंद्र चव्हाण या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर आमदारकीचं तिकीट मिळाल्यानंतर २०१० साली अर्चना कोठावदे आणि २०१५ साली संदीप पुराणीक हे या मतदारसंघातून निवडून आले. संघ विचारसरणीचा प्रभाग म्हणून ओळख असलेल्या वॉर्डाची तोडफोड करत यंदा हा वॉर्ड पेंडसेनगर आणि सारस्वत कॉलनी या दोन वॉर्डात विभागण्यात आला आहे.

हे वाचलं का?

या प्रभागरचनेवर टीका करताना रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनेने प्रशासनाला हाताशी धरुन आपले जास्तीत जास्त नगरसेवर निवडून आणण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. याचसोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा वॉर्ड प्रभाग रचनेतून वगळल्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टीकाही रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

ठाणे महापालिका प्रभाग रचना : शिवसेना-राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न

ADVERTISEMENT

नवीन प्रभाग रचनेत कल्याण-डोंबिवली महापालिकेत ११ नवीन प्रभागांची भर पडली आहे. यापूर्वी १२२ प्रभाग कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत होते. ही संख्या आता १३३ झाली आहे. शिवसेनेतील प्रस्थापित नगरसेवकांनी बहुप्रभाग सदस्य पद्धतीतही आपआपले प्रभाग राखल्याची चर्चा आहे. प्रारूप यादीवरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधत शिवसेनेने आपल्या सोयीची प्रारूप यादी केली असल्याची टीका केली आहे.

ADVERTISEMENT

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वॉर्ड यंदाच्या प्रभाग रचनेत वगळण्यात आला असला तरीही ज्या वॉर्डात हा विभाग टाकण्यात आला आहे ते पेंडसे नगर आणि सारस्वत कॉलनी हे भागही भाजपच्या हातात आहेत. त्यामुळे राजकीय दृष्ट्या भाजपला याचा फारसा फटका बसण्याची शक्यता कमी असली तरीही निवडणुकीच्या आधी शिवसेनेने विद्यमान आमदारांना डिवचण्याची संधी सोडली नाहीये.

कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या काळात शिवसेनेचे ठरावीक नगरसेवक आपले वर्चस्व अबाधित ठेवून आहेत. या नगरसेवकांचे प्रभाग नव्या रचनेतही आबाधित राहिल्याचे नव्या सीमांकनावरून स्पष्ट होत आहे. परंतू भाजप नगरसेवकांचे सध्याचे काही प्रभाग शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांच्या किंवा दोन शिवसेनेचे उमेदवार असलेल्या प्रभागाला जोडण्यात आले आहेत. ज्याचा फटका आगामी निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT