Kerala Rain: संपूर्ण घर नदीत गेलं वाहून, भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद; केरळात पावसाचा प्रलय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तिरुअनंतपुरम: मागील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील मराठवाड्यात पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ वादळाचा परिणाम महाराष्ट्रावर झाला होता. ज्यामुळे मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने पूरजन्य परिस्थिती निर्माण केली होती. असं असताना आता भारताच्या दक्षिणेकडील सर्वात शेवटचं राज्य असलेल्या केरळमध्ये पावसाने अक्षरश: प्रलय ओढवला आहे.

ADVERTISEMENT

सध्या मुसळधार पावसामुळे केरळमधील (Kerala Rain) अनेक भागात पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात गाड्या तरंगताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी नदीच्या काठावर असणारी अख्खी घरं ही पाण्यात वाहून गेल्याची भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. एवढेच नाही तर केरळच्या या भयंकर पावसाने आतापर्यंत 26 जणांचा बळी घेतला आहे.

केरळमधून नुकतेच आलेले काही व्हीडिओ आणि फोटो हे अक्षरश: थरकाप उडवणारी आहेत. आता देखील तिरुवल्ला येथे घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणांचा आसरा घ्यावा लागत आहे.

हे वाचलं का?

केरळमधील पावसाची शक्यता असणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. काल रात्रीही अनेक भागात अधूनमधून जोरदार पर्जन्यवृष्टी ही सुरुच होती. आज पटनमथीटा या येथील सखल भागात पूर येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे इथे NDRFच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंबा नदीवर बांधलेल्या कक्की धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यामुळे धरणातून येणाऱ्या पाण्याचा सखल भागांवर परिणाम होऊन परिस्थिती गंभीर बनू शकते.

ADVERTISEMENT

पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

ADVERTISEMENT

‘देवभूमी’ म्हटल्या जाणाऱ्या केरळची सध्याची परिस्थिती ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. केरळमध्ये आधीच कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहेत. ज्याचा फटका त्यांच्या पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात आता मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती ओढावली आहे. ज्यामुळे आता येथील रोगराईमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे येथील नागरिकांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घरं, गाड्या पुराच्या पाण्यात गेल्या वाहून

दरम्यान, येथील पुराचे आता अनेक भयानक व्हीडिओ समोर आले आहेत. काहींमध्ये गाड्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. त्याच वेळी, कोट्टायमच्या मुंडकायममधून एक भयंकर व्हीडिओ समोर आला आहे. जेथे मुसळधार पावसानंतर नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की नदी किनारी असलेलं एक संपूर्ण घर पाण्यात वाहून गेलं. याचे आणखीही काही व्हीडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये, पाण्याच्या प्रचंड दाबाने प्रचंड मोठी झाडं ही उन्मळून पडत आहेत.

Maharashtra Rain Update: अकोल्यात तुफान पाऊस, नदीला पूर आल्याने अनेक गावं पाण्याखाली

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केरळमध्ये ढगफुटीमुळे पुराची परिस्थिती उद्भवली आहे आणि पुराच्या पाण्यामुळे भूस्खलन झालं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाचे (CUST)वैज्ञानिक एस अभिलाष यांनी इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यांच्या सर्वात जास्त प्रभावित भागात दोन तासात 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचं म्हटलं आहे. जी एकप्रकारची ढगफुटीचीच घटना आहे.

दुसरीकडे, केरळमधील पूर परिस्थितीवर केंद्र सरकार देखील लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील परिस्थितीवर बोलताना सांगितलं की, केरळमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित लोकांना केंद्र सर्वतोपरी मदत करेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT