Uddhav : ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्ला, 'काही जणांना मस्ती आलीय, तीच उतरवायला...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticize cm eknath shinde thane loksabha election 2024 rajan vichare vs naresh mhaske
काहींना मस्ती आलीय, ही मस्ती उतरवायला मी आलो आहे.
social share
google news

Uddhav Thackeray criticize CM Eknath Shinde : 'काही जणांना मस्ती आली आहे. त्यांना वाटतं की ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे. ती मस्ती उतरवण्यासाठी मी आले आहे. आज मला खात्री पटलीय, मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे जण आले आहात', असा जोरदार हल्लाबोल शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्यावर केला. ठाणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. (uddhav thackeray criticize cm eknath shinde thane loksabha election 2024 rajan vichare vs naresh mhaske)

'जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात, ती बेअक्कली माणसं मी महाराष्ट्रात सहन करणार नाही. आमचं नाण खणखणीत आहे मोदींसारख तकलादू नाही आहे. मोदींचं नाण महाराष्ट्रात चालत नाही म्हणून त्यांना माझ्या वडीलांचा फोटो बाजूला लावावा लागतोय. हे आम्हाला हिणवायचे मोदींच्या फोटोमुळे तुमचे खासदार निवडून आले. मग आता मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय. गद्दारांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवून दाखवावी. राजकारणात जर तुमचे बाप मोदी असतील तर त्यांचे फोटो लावा, असे आव्हान ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले.

हे ही वाचा : Baramati Lok Sabha 2024 : सुप्रिया सुळे अजित पवारांवर प्रचंड चिडल्या

तुम्ही 370 कलम काढलं. तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला. कारण काश्मीर आमच्या हिंदूस्थानचा अविभाज्य घटक आहे. पण गेल्या 10 वर्षात काश्मीर असुरक्षित आहेत. तेव्हा काय केलं? सत्यपाल मलिकांनी तुमचं बिंग फोडलं. त्यांनी सांगितलं होतं रस्त्याने जाऊ देण सैनिकांसाठी धोकादायक आहे. तुमच्या नादान पणामुळे पुलवामामध्ये सैनिकांचा जीव गेला. सत्यपाल मलिक यांनी तुमचे ढोंग समोर आणले आहे.यावर का बोलत नाही. मोदी कधी महागाई, बेकारी, नोकऱ्या, महिला सुरक्षेवर बोलत नाहीत. फक्त धर्मावर बोलतात, अशी टीका ठाकरेंनी मोदींवर केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : रोहित पवारांच्या अश्रूंचा फुटला बांध, शरद पवारांकडे बघत म्हणाले, 'पुन्हा असं बोलू नका'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT