Khel Ratna Award : खेलरत्न पुरस्कार आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खेलरत्न पुरस्काराचं नाव आता बदलण्यात आलं आहे. खेलरत्न पुरस्काराचं नाव आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याऐवजी मेजर ध्यानचंद पुरस्कार यांच्या नावानं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. भारतातील नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने असावं असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल असंही मोदी यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं पुरस्काराला देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

‘देश को गर्वित कर देने वाले पलों के बीच अनेक देशवासियों का ये आग्रह भी सामने आया है कि खेल रत्न पुरस्कार का नाम मेजर ध्यानचंद जी को समर्पित किया जाए। लोगों की भावनाओं को देखते हुए, इसका नाम अब मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार किया जा रहा है। जय हिंद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये 13 गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे 1936 मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी 39 गोल केले होते.

हे वाचलं का?

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये 1928 अमस्टर्डम, 1932 लॉस एंजेलिस आणि 1936 बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला देण्यात आलेला आहे. सध्या जपानमध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं अतुलनीय कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक मिळवलं आहे. तर महिला संघाचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT