अनिल देशमुखांना अटक, आता नंबर…; सोमय्यांनी घेतलं शिवसेनेच्या नेत्याचं नाव
अनेक महिन्यांनंतर ईडीसमोर हजर झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख सोमवारी चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होते. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुखांना अटक होताच किरीट सोमय्यांनी आता सेनेच्या नेत्याचा नंबर असल्याचं सांगत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 100 कोटी वसुलीचा आरोप […]
ADVERTISEMENT

अनेक महिन्यांनंतर ईडीसमोर हजर झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख सोमवारी चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होते. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुखांना अटक होताच किरीट सोमय्यांनी आता सेनेच्या नेत्याचा नंबर असल्याचं सांगत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
100 कोटी वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सोमवारी समोर आले. देशमुख यांनी भूमिका मांडत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजेरी लावली. 12 तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. देशमुख यांना अटक करण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
काय म्हणाले सोमय्या?
अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर सोमय्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ‘अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. 100 कोटींहून अधिक मनी लाँड्रिंग घोटाळा. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार. महिन्याला जी 100 कोटींची वसुली येत होती, त्यातील शरद पवारांकडे किती जात होती आणि उद्धव ठाकरेंकडे किती? अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे’, असं सोमय्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.