kissing device : लाँग डिस्टन्स पार्टनरला करता येणार किस, मार्केटमध्ये आलाय रिमोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

kissing Device : एका चिनी शास्त्रज्ञाने (Long Distance)लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये (Relationship) असलेल्या जोडप्यांसाठी एक अनोखे उपकरण (Unique Device) विकसित केले आहे. त्याला किसिंग डिव्हाइस म्हटले जात आहे. याद्वारे दूरवर बसलेले जोडपे एकमेकांचे चुंबन घेऊ शकतील. या उपकरणाच्या निर्मात्याचा दावा आहे की त्याच्या मदतीने जोडप्यांना वास्तविक चुंबनासारखे वाटेल. A special device for long distance couples

ADVERTISEMENT

VIRAL: एक बुलेटवर हिजाब घातलेल्या 4 मुली, बाईकवरून दिलं फ्लाइंग KISS

ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या किसिंग उपकरणाचे ओठ सिलिकॉनचे बनलेले आहेत. यामध्ये एक सेन्सरही बसवण्यात आला आहे, ज्यामुळे किस करताना ओठांना खरे चुंबनासारखे वाटेल. हे उपकरण ओठांचा दाब, हालचाल आणि तापमान देखील जाणवू शकते.या उपकरणाचे पेटंट चांगझोउ व्होकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेकाट्रॉनिक टेक्नॉलॉजीने केले आहे. याचा शोध लावणाऱ्या जियांग झोंगली या शास्त्रज्ञाने सांगितले की, तो त्याच्या मैत्रिणीसोबत लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होता आणि तो फक्त फोनवरच संपर्क करू शकायचा. तेथून त्याला हे उपकरण बनवण्याची कल्पना सुचली.

हे वाचलं का?

किती आहे किंमत?

चायनीज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Taobao वर त्याची किंमत 288 युआन (सुमारे 3400 रुपये) ठेवण्यात आली आहे. जर कोणी जोडीने ऑर्डर केली तर त्यासाठी 550 युआन (सुमारे 6,000 रुपये) द्यावे लागतील. दर महिन्याला 100 हून अधिक ‘किसिंग उपकरणे’ विकली जात असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे डिजिटल रेप? नोएडातल्या ८१ वर्षांच्या वृद्धावर नेमका आरोप काय?

ADVERTISEMENT

हे उपकरण वापरण्यासाठी वापरकर्त्यांना मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर डिव्हाइसला फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये प्लग इन करावे लागेल. अॅपवर पार्टनरसोबत पेअर केल्यानंतर ते व्हिडिओ कॉल करू शकतात आणि ‘रिमोट किसिंग’ करू शकतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT