कोल्हापूर : व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत लाखो रुपयांना लुटलं, ६ जणांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मैत्रीच्या बहाण्यानं विश्‍वास संपादन करून कोल्हापुरातील एका व्यापार्‍याला लाखो रुपयांना लुटण्याची घटना नुकतीच घडलीय. त्या व्यापार्‍याला मारहाण करून, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन रोख अडीच लाख आणि सोन्याचे दागिने गहाण ठेवून आणखी काही लाखांची रक्कम लुटली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ६ संशयितांना शिताफीनं अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि शस्त्र असं लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय.

ADVERTISEMENT

कोल्हापुरातील प्रसिद्ध कापड व्यापार्‍याशी एका अनोळखी मुलीनं १५ दिवसांपूर्वी What’s App वरुन चॅटींगद्वारे मैत्री केली. यानंतर या मुलीने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करुन त्याला फ्लॅटवर भेटायला बोलावलं. तिथं आल्यानंतर मुलीच्या टोळीतील मित्रांनी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन, त्याच्याच वाहनातून पन्हाळा रस्त्यावरील केर्ली गावानजीक निर्जनस्थळी नेऊन त्याला मारहाण केली. या टोळीने व्यापाऱ्याच्या वाहनातील दीड लाख रुपये आणि सह्या केलेले तीन कोरे चेक काढून घेतले.

यानंतर या टोळीने त्याच्याच गाडीतून कोल्हापुरातील बागल चौक इथल्या मुथ्थूट फायनान्सच्या शाखेत नेलं. व्यापार्‍याच्या अंगावरील दागिने गहाण ठेवायला लावून, त्यावर १ लाख रुपये उचलले. हा प्रकार झाल्यानंतरही या टोळीकडून व्यापाऱ्याला वारंवार लाखो रुपयांची मागणी केली जाऊ लागली. त्यामुळं संबंधित व्यापार्‍यानं संशयितांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती.

हे वाचलं का?

यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कारंडे, किरण गावडे, कुमार पोतदार, संजय पडवळ, पांडुरंग पाटील, सुप्रिया कात्रट यांनी वेगानं तपास करून, संभाजीनगर इथं टोळीतील प्रमुख सागर माने, सोयल वाटंगी, उमेश साळुंखे, आकाश माळी, लुकमान सोलापुरे, सौरभ चांदणे या सहा जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून धारधार शस्त्र, मोबाईल, दुचाकी असं लाखाचं साहित्य जप्त केलं. संबंधित महिलेचाही शोध सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT