रमेश लटकेंनी आमदारकीची पहिली निवडणूक एका विधवेविरोधातच लढवली होती…!
– दिपक सूर्यवंशी अंधेरीचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर सध्या इथं पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र भाजपने मुरजी पटेल यांना निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यायला लावली. विधवेच्या विरोधात उमेदवार दिल्याने भाजपवर […]
ADVERTISEMENT

– दिपक सूर्यवंशी
अंधेरीचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर सध्या इथं पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र भाजपने मुरजी पटेल यांना निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यायला लावली.
विधवेच्या विरोधात उमेदवार दिल्याने भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका सुरु होती. भाजपने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही पुढे सरसावले. त्यामुळे भाजपवर दबाव वाढला आणि मुरजी पटेल यांनी माघार घेतली. पण २२ वर्षापुर्वी खुद्द दिवंगत रमेश लटके यांनीच आपली आमदारकीची पहिली निवडणूक एका विधवा महिलेच्या विरोधात लढवली होती.
रमेश लटके मुळचे कोल्हापूरचे :
दिवंगत रमेश लटके हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील धुमकवाडी गावचे रहिवासी. खूप कमी वयात त्यांनी कामासाठी मुंबई गाठली. मुंबईमध्ये ते वडिलांसोबत दूध आणि हार विकण्याचा व्यवसाय करायचे. याच दरम्यान, त्यांचा संपर्क हा शिवसेनेशी आला.