बाप मुलासोबत पोरगी बघायला गेला अन् वडिलांना मुलीची आईच पसंत पडली! नंतर, घडला विचित्र प्रकार...
आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी बघायला गेलेल्या वडिलांचा मुलीच्या आईवरच जीव जडला. म्हणजेच, मुलाचे वडील नात्याने व्याही लागणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बाप मुलासोबत पोरगी बघायला गेला अन् वडिलांना मुलीची आईच पसंत पडली!
अनोखं प्रेम प्रकरण चर्चेत
Extra Marital Affair: असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं आणि प्रेमाला वयाचं बंधन नसतं. खरं तर, प्रेम कधीही, कुठेही आणि कोणावरही होऊ शकतं. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून अशीच एक वेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. येथे आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी बघायला गेलेल्या वडिलांचा मुलीच्या आईवरच जीव जडला. म्हणजेच, मुलाचे वडील नात्याने व्याही लागणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडल्याची माहिती आहे.
कुटुंबियांना मोठा धक्का बसला
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला. याबाबत कुटुंबियांना काहीच कल्पना नसल्याने अचानक नेमकं काय सुरू आहे, हेच त्यांना कळत नव्हतं. या प्रेम प्रकरणामुळे झालेला वाद अगदी टोकाला पोहोचला आणि महिला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार करण्यात आली. पोलिसांना तक्रार मिळताच संबंधित व्यक्ती आणि महिलेला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. त्यानंतर, नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत बनणार 70 किमी लांब अंडरग्राउंड रोड नेटवर्क! कसं असेल कनेक्शन?
पती आणि विहीणबाईच्या प्रेमसंबंधाबाबात तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपुर जिल्ह्यातील खागा कोतवाली परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलाचं लग्न मेहवाघाट कोतवाली परिसरातील एका गावात राहणाऱ्या मुलीसोबत ठरवलं होतं. जवळपास तीन महिन्यांपूर्वी संबंधित व्यक्ती आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी बघायला गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुलाच्या वडिलांना त्या मुलीची आईच पसंत पडली. त्यानंतर, नात्याने व्याही लागणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा महिलेचं प्रेम जडलं. दोघांमध्ये सतत बोलणं सुरू झालं. हे प्रकरण पुढे वाढत गेल्यानंतर, एके दिवशी संबंधित व्यक्तीच्या पत्नीला आपल्या पती आणि विहीणबाईच्या प्रेमसंबंधाबद्दल कळालं. हे प्रेम प्रकरण मर्यादेच्या पलिकडे गेल्यानंतर, पत्नीने मंझनपुर महिला पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली.
हे ही वाचा: वडील हयात नाहीत, आईला कॅन्सर; धंद्यासाठी कपड्यांची खरेदी करायला गेला अन् दिल्ली ब्लास्टमध्ये...
अखेर कुटुंबियांनी घेतला 'तो' निर्णय
तक्रार मिळताच, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून समजावून सांगितलं. अखेर, दोघांमधील हे प्रकरण मिटलं आणि मुलीचं लग्न संबंधित घरातील मुलासोबत लावून न देण्याचा दोन्ही कुटुंबियांमध्ये व्याही म्हणून कोणतेच संबंध न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.










