मुंबईची खबर: मुंबईत बनणार 70 किमी लांब अंडरग्राउंड रोड नेटवर्क! कसं असेल कनेक्शन?

मुंबई तक

मुंबईतील अधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांवर प्रवशांना नवा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देणे, हाच या नेटवर्कचा उद्देश असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

70 किमी लांब अंडरग्राउंड रोड नेटवर्क!
70 किमी लांब अंडरग्राउंड रोड नेटवर्क!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत बनणार 70 किमी लांब अंडरग्राउंड रोड नेटवर्क!

point

कसं असेल अंडरग्राउंड रोडचं कनेक्शन?

Mumbai News: मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शहराखाली 70 किमी लांब अंडरग्राउंड रोड नेटवर्क तयार करण्याची योजना आखल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील अधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांवर प्रवशांना नवा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देणे, हाच या नेटवर्कचा उद्देश असल्याची माहिती आहे. हा 70 किमी लांब अंडरग्राउंड मार्ग कोस्टल रोड, बीकेसी, बुलेट ट्रेन, एअरपोर्ट, वेस्टर्न आणि ईस्टर्न हायवे, तसेच एसवी रोडसह महत्त्वाच्या मार्गांना कनेक्ट होणार असल्याचं वृत्त आहे. 

रोड नेटवर्कचं काम तीन टप्प्यांत...

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रोड नेटवर्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू केलं असून हे काम तीन टप्प्यांत केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या फेजमध्ये 16 किलोमीटर, दुसऱ्या फेजमध्ये 10 किलोमीटर आणि तिसऱ्या फेजमध्ये 44 किलोमीटर मार्गाचं काम पूर्ण केलं जाणार आहे. 'एमएमआरडी'चे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फेजसाठी टेक्नो-इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डीपीआरसाठी कंसल्टंट नियुक्तीला मंजूरी दिली आहे. 

16 किमी लांब अंडरग्राउंड रोड 

पहिल्या टप्प्यात 16 किमी लांब अंडरग्राउंड रोड तयार केला जाणार असून हा मार्ग वांद्रे-वरळी सी लिंक, बीकेसी, एअरपोर्ट आणि बीकेसीमध्ये तयार होणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशनला कनेक्ट होणार आहे. यामुळे 'एमएमआरडी'ला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि एसव्ही रोडवरील ट्रॅफिक कमी होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. या 16 किलोमीटरच्या अंडरग्राउंड मार्गावरून प्रवासी दक्षिण मुंबई ते उपनगर पर्यंत अगदी वेगात पोहचू शकतील. 

हे ही वाचा: Govt Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी निघाली भरती... काय आहे पात्रता?

वेस्टर्न-इस्टर्न हायवे कनेक्ट करण्यासाठी मार्ग 

सरकारने वेस्टर्न-इस्टर्न हायवे कनेक्ट करण्यासाठी 10 किमीचा मार्ग तयार करण्याची योजना आखली आहे. सध्याच्या काळात, वाहन चालक एससीएलआर एक्सटेंशन किंवा इतर मार्गांच्या साहाय्याने एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गापर्यंत पोहोचतात. या दरम्यान, प्रवाशांना बऱ्याच ठिकाणांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता, प्रवाशांसाठी नवा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर ट्रॅफिक कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp