S. N. Subrahmanyam : "90 तास काम करा, बायकोकडे किती बघत बसणार...", L & T चे सर्वेसर्वा सुब्रमण्यम यांचं वक्तव्य
एल अँड टी चेअरमन एस एन सुब्रह्मण्यम हे कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान बोलताना आठवड्यात 90 तास काम करण्याचा सल्ला दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एस. एन. सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्यानं वाद
सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा
सुब्रह्मण्यम यांच्या या मतावर अनेकांची टीका
एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आणि सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ सुरू झाला. या वक्तव्यावरुन चित्रपट जगतापासून ते व्यावसायिक जगतापर्यंत मोठी बड्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली. गेल्या वर्षी इन्फोसिसच्या सह-संस्थापकांनी 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता, त्यावेळीही देशात अशीच एक चर्चा सुरू झाली होती. आठवड्यात 90 तास काम करण्याबद्दल ते बोलले आणि त्यानंतर झालेल्या टीकेनंतर त्यांनी आता स्पष्टीकरणही दिलं आहे.
संपूर्ण प्रकरण काय?
एल अँड टी चेअरमन एस एन सुब्रह्मण्यम हे कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान बोलताना आठवड्यात 90 तास काम करण्याचा सल्ला दिला. तसंच पुढे ते म्हणाले, "रविवारी मी तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही याबद्दल मला वाईट वाटतं, जर मी हे करू शकलो तर मी हे करेन. कारण मी स्वतः रविवारी काम करतो."
हे ही वाचा >> PM Narendra Modi : "माझ्याकडूनही चुका होतात, मी सुद्धा माणूस आहे, देव थोडी आहे...", का म्हणाले पंतप्रधान मोदी?
एवढंच नाही, तर रेडीटवर प्रसारित झालेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, एल अँड टी एस एन सुब्रह्मण्यम हे फक्त 90 तास काम करण्याचा सल्ला देऊन थांबले नाही, ते पुढे म्हणाले, "घरी राहून तुम्ही किती वेळ तुमच्या पत्नीकडे बघत राहाल? घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा." असं एस एन सुब्रह्मण्यम हे म्हणाले.
एस एन सुब्रह्मण्यम यांच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू झाला. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका या वक्तव्याचा निषेध केला. असे निर्णय घेताना सनडे चं नाव बदलून सनड्युटी केलं पाहिजे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टा स्टोरीवर सुब्रमण्यम यांच्या विधानाचा निषेध केलेलं दिसलं. 'एवढ्या उच्च पदावर बसलेली एक वरिष्ठ व्यक्ती असं विधान कसं करून शकते, हे वाचून धक्का बसला, कारण मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे.'










