लडाख बस दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील विजय शिंदे यांचाही मृत्यू, गावावर शोककळा

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आज सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला.

हे वाचलं का?

लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत पडले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत.

इतर जवानही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हवाई मार्गाने हलवण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काय घडली घटना?

थोइस या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर ही घटना घडली. लष्कराची बस श्योक नदीत कोसळली. ही बस ५० ते ६० खोल बुडाली. त्यामुळे लष्कराचे जवान जखमी झाले. या घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला. सगळ्या जवानांना परतापूरच्या ४०३ फिल्ड रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. त्यानंतर लेहहून सर्जिकल टीम परतापूर या ठिकाणी पाठवण्यात आली. या घटनेत सात जवान शहीद झाले आहेत.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांना सर्वोत्तम उपचार यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गंभीर जखमींना वेस्टर्नना कमांडमध्ये हलवलं गेलं आहे. शुक्रवारी २६ जवानांना घेऊन बस परतापूरच्या शिबिरातून बस हनिफच्या पुढच्या ठिकाणी ही बस चालली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. रस्त्यापासून नदीची खोली ५० ते ६० फूट आहे. त्यामुळे या बसमध्ये बसलेले सगळे जवान जखमी झाले. यापैकी सात जवानांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा हा ट्रक परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होता. जेव्हा हा ट्रक थोईसपासून २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. या अपघातात ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT