लखीमपूर प्रकरण : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढल्या; ‘फॉरेन्सिक’चा रिपोर्ट आला समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशसह देशभरात चर्चिल्या गेलेल्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणी (Lakhimpur kheri violence) नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा (ashish mishra) (केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा) व अंकित दास (ankit das) या दोघांचे पिस्तुल पोलिसांनी जप्त केलेले होते. त्याचे अहवाल अखेर समोर आला असून, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Ankit Das, Ashish Misra were fired during violence says Forensic report)

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी परिसरात 3 ऑक्टोबर रोजी निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याची घटना घडली होती. या घटनेत चार शेतकरी मरण पावले होते. तर त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत चार जणांचा मृत्यू झाला होता.

शेतकऱ्यांच्या उडवतानाचा गाडीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्याचबरोबर या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह काही जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अजय मिश्राला पोलिसांनी अटक केलेली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, या हिंसाचारावेळी अजय मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केल्याचा दावा आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. तर पोलिसांनी अजय मिश्रा आणि अंकित दास यांचे पिस्तुल जप्त केलेले होते. हे पिस्तुल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल समोर आला असून, अंकित दास आणि आशिष मिश्राकडून जप्त करण्यात आलेल्या रायफल, गन आणि पिस्तुलमधून गोळीबार केल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे.

पोलिसांनी घटनेनंतर आशिष मिश्राची रायफल व रिव्हॉल्वर आणि अंकित दास याची रिपीटर गन व पिस्तुल जप्त केली होती. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यानंतर गोळीबारही करण्यात आल्याचं आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी शस्त्र जप्त करून फॉरेन्सिककडे पाठवली होती.

ADVERTISEMENT

आंदोलनात गोळीबार झाला का?

ADVERTISEMENT

फॉरेन्सिकच्या अहवालातून आशिष मिश्रा आणि अंकित दास यांच्याकडील शस्त्रातून गोळीबार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, घटनास्थळावरून ज्यातून गोळीबार करण्यात आला, त्याचे पुरावे सापडल्यानंतरच हे स्पष्ट होईल, असं मत माजी डीजीपी ब्रिजलाल यांनी मांडलं आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर आहेत गंभीर आरोप

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर लखीमपूर खेरी येथील टिकुनियामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आंदोलक शेतकऱ्यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. आशिष मिश्राच्या समोर शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा तसेच त्यानंतर गोळीबार केल्याचा आरोप केलेला आहे. सध्या आशिष मिश्रा तुरुंगात आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT