विधान परिषद निवडणूक: ‘बच्चू कडूंना विनंती करणार’, बावनकुळे असं का म्हणाले?
धनंजय साबळे, प्रतिनिधी (अमरावती) Legislative council election 2023 Bachchu Kadu: अमरावती: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणूक (Legislative council election) होत आहे. या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सर्व जागेवर उमेदवार दिले आहेत. यामुळे भाजपची (BJP) बरीच अडचण होण्याची शक्यता आहे. […]
ADVERTISEMENT
धनंजय साबळे, प्रतिनिधी (अमरावती)
ADVERTISEMENT
Legislative council election 2023 Bachchu Kadu: अमरावती: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणूक (Legislative council election) होत आहे. या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सर्व जागेवर उमेदवार दिले आहेत. यामुळे भाजपची (BJP) बरीच अडचण होण्याची शक्यता आहे. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (legislative council election 2023 why did chandrashekhar bawankule say that bachchu kadu will be requested)
‘आमदार बच्चू कडू यांना मी नागपूरला आज भेटणार आहे, आपण सत्ताधारी पक्षांमध्ये आहात त्यामुळे सोबत निवडणूक लढवली पाहिजे. अशी विनंती मी बच्चू कडू यांना करणार आहे.’ अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रमुख पक्ष हे विधान परिषदेच्या आखाड्यात असताना त्यात आमदार बच्चू कडूंनीही दंड थोपटले आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षानंही उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याच भूमिकेमुळे बच्चू कडूंनी थेट शिंदे-फडणवीसांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Bachchu Kadu Health : डोक्याला गंभीर इजा, बच्चू कडूंना नागपूरला हलवलं
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणूक : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बच्चू कडूंनी कोणाला दिली उमेदवारी?
विधान परिषद निवडणुकीत प्रहार जनशक्तीचे उमेदवार किरण चौधरी (अमरावती पदवीधर मतदारसंघ), डॉ. संजय तायडे (औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ), नरेश कोंडा (कोकण शिक्षक मतदारसंघ), प्रा. सुभाष जंगळे (नाशिक पदवीधर मतदारसंघ), अतुल रायकर (नागपूर शिक्षक मतदारसंघ) यांना बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
आता या 5 जागांवर कोण बाजी मारणार, भाजपकडून बच्चू कडूंची कशी समजूत काढली जाणार, महाविकास आघाडी कशा पद्धतीने निवडणूक लढवणार. या सगळ्याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
बच्चू कडू आक्रमक होताच मिळालं फळ! शिंदे-फडणवीसांनी मंजूर केला ५०० कोटींचा प्रकल्प
रवी राणा व नवनीत राणांनी भाजपमध्ये यावं: बावनकुळे
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याबाबत देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. दोघांचेही विचार हिंदुत्ववादी आहेत. नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजप पक्षामध्ये यावं त्यांनी वेगळी निवडणूक लढवू नये. त्यांनी भाजपमध्ये येऊन भाजप पक्ष स्वीकारावा अशी असंही वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT