एलॉन मस्कने ‘या’ महिलेला बनवलं ट्विटरचं नवं CEO, कोण आहे लिंडा याकारिनो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

linda yacarino became the new ceo of twitter elon musk announced
linda yacarino became the new ceo of twitter elon musk announced
social share
google news

वॉश्गिंटन: एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नवीन सीईओच्या (Twitter New CEO) नावाची घोषणा केली आहे. मस्क यांनी ही जबाबदारी लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांच्याकडे सोपवली आहे. 2022 मध्ये भारतीय वंशाचे अभियंता पराग अग्रवाल यांना या पदावरून हटवल्यानंतर मस्क स्वतः हे पद सांभाळत होते. पण शुक्रवारी, 12 मे रोजी सकाळी त्यांनी सांगितले की ट्विटरसाठी नवीन सीईओ सापडला आहे. संध्याकाळी, मस्कने दुसर्‍या ट्विटमध्ये लिंडा याकारिनो यांची ट्विटरची पुढील सीईओ म्हणून घोषणा केली. त्याने भविष्यातील त्याचा नेमका काय प्लॅन काय आहे हेही सांगितले. (linda yacarino became the new ceo of twitter elon musk announced)

ADVERTISEMENT

एलॉन मस्कने केली घोषणा

“ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनोचे स्वागत करताना मी उत्साहित आहे. लिंडा प्रामुख्याने व्यवसाय ऑपरेशन्स हाताळेल, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करेन. मी अॅपचे रूपांतर करण्यासाठी लिंडासोबत काम करेन.”

कोण आहे लिंडा याकारिनो?

लिंडा 2011 पासून एनबीसी युनिव्हर्सलमध्ये काम करत आहे. तिच्या लिंक्डइन अकाउंटनुसार, ती NBC च्या जागतिक जाहिराती आणि भागीदारीची जबाबदारी सांभाळत आली आहे. लिंडाने पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आहे. तिने 1981-1985 दरम्यान लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनचा अभ्यास केला आहे.

हे वाचलं का?

लिंडा याकारिनो

एनबीसीच्या आधी, लिंडाने आंतरराष्ट्रीय मीडिया कंपनी टर्नर ग्रुपसाठी 19 वर्षे काम केले आहे. तिथे ती विक्री, विपणन आणि संपादन विभागात काम करत होती. मनोरंजन क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक असल्याचा पुरस्कारही तिला मिळाला आहे.

मस्कला सीईओ व्हायचे नव्हते

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एलॉन मस्कने ट्विटर 44 बिलियन डॉलर्सला (साडेतीन लाख कोटी रुपये) विकत घेतले होते. काही आठवड्यांनंतर, मस्कने डेलावेअर न्यायालयात सांगितले होते की, त्याला कोणत्याही कंपनीचे सीईओ बनायचे नाही.

ADVERTISEMENT

“मी ट्विटरवरील माझा वेळ कमी करण्याचा आणि ट्विटर चालवण्यासाठी दुसरा कोणीतरी शोधण्याचा विचार करत आहे.” असं मस्कने म्हटलं होतं.

एका महिन्यानंतर, मस्क यांनी ट्विट केलेलं की, “मला या कामासाठी कोणीतरी सापडताच, मी सीईओ पदाचा राजीनामा देईन.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटरच्या नवीन सीईओच्या घोषणेनंतर मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये सुमारे 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्विटरवर मस्कचे किती लक्ष वेधले जात आहे, याची चिंता त्याच्या भागधारकांना नेहमीच वाटत असते. आता असे बोलले जात आहे की याकारिनोला कामावर घेतल्यानंतर मस्क टेस्लाकडे अधिक लक्ष देऊ शकेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT