Maharashtra Political crisis : शिवसेना फुटली! एकनाथ शिंदेंची ‘बेरीज’ झाली?
शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० […]
ADVERTISEMENT

शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा अधिक आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा गेल्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन भेटावं असं सांगत मातोश्री सोडली. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर चित्र आणखीनच बदललं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या निवेदनानंतर शिवसेनेचे आणखी आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माहिमचे आमदार सदा सरवणकर, कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर आणि माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकरही गुवाहाटीत पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदेंना आवश्यक असलेल्या आकड्याची बेरीज जवळपास झाली असल्याचं दिसतंय.
दुसरीकडे एकाच वेळी दोन तृतीयांश आमदार फुटल्याने शिवसेनेच्या बाजूने बोटावर मोजण्याइतकेच आमदार शिल्लक राहिले आहेत.