कल्याण : भंडार्लीच्या जागेवर ठाणे मनपाकडून कचरा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात, ग्रामस्थ आक्रमक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण ग्रामीण भागातील भांडर्ली येथील जागेवर कचरा प्रकल्पाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. ठाणे महापालिकेने कल्याणच्या भांडर्ली गावातील चार हेक्टर जागा कचरा प्रकल्पासाठी भाडेतत्वावर घेतली आहे. परंतू या निर्णयाला भंडार्ली गावातील नागरिकांसह १४ गावांचाही विरोध आहे. हा विरोध कायम असतानाही आज ठाणे मनपाने या जागेवर कचरा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले पहायला मिळाले.

ADVERTISEMENT

कचरा प्रकल्पाच्या जागेवर जमा होऊन आज स्थानिक नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने शीळ-पनवेल हायवेवर डायघर पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला होता. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आंदोलनस्थळी भेट देत, ठाणे मनपाने कचऱ्याची विल्हेवाट आपल्याच हद्दीत लावायला हवी असं सांगितलं. ठाणे शहरात मोठमोठी गृहसंकुल उभी राहत असताना त्यांचा कचरा या गावकऱ्यांच्या माथी मारला जातोय याचा निषेध करत असल्याचं सुभाष भोईर म्हणाले.

मनसे आमदार राजू पाटील यांनीही या प्रकरणावर ट्विट करत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेवर डम्पिंग ग्राऊंड उभारलं जाणार नसून इथे शास्त्रोत्क पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. आज फक्त प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आज हे आंदोलन तुर्तास थांबले असले तरीही भविष्यात हा प्रश्न पेटण्याची चिन्ह आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT