ठाण्यातील हॉटस्पॉट क्षेत्रात आता ३१ मार्चपर्यंत Lockdown

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाण्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत त्यामुळ हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं ठाणे महापालिकेने स्पष्ट केलं आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे रूग्ण वाढीमुळे ठाण्यातील १६ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी,रूग्णसंख्या वाढतीच राहिली आहे. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा १६ झाली आहे.तेव्हा,कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या १६ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात कहर माजवण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील तीन परिमंडळात १६ ठिकाणं कोरोनाची हॉटस्पॉटमध्ये म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रं निश्चित केली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी या १६ हॉटस्पॉट्स मध्ये ३१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

ADVERTISEMENT

यामध्ये परिमंडळ एकमधील कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा,आईनगर,सूर्यनगर,खारेगाव परिसर हे हॉटस्पॉट आहे.तर,परीमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा,वागळे व श्रीनगर परिसर हॉटस्पॉट आहेत. परिमंडळ ३ मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील,बाळकुम,लोढा व लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार,शिवाई नगर,कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी ‘ वृदांवन येथे लॉकडाऊन ३१ मार्च.पर्यत ठेवण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी राज्य शासनाच्या नियमांतर्गत सर्व व्यवहार सुरळीत राहतील असेही अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT