कोरोनाचे नियम म्हणजे खो-खो चा खेळ वाटला का? अनलॉकच्या गोंधळावर प्रवीण दरेकरांची संतप्त प्रतिक्रीया
राज्यातील ठराविक जिल्ह्यांमध्ये केलेली अनलॉकची घोषणा आणि त्यानंतर घ्यावा लागलेला यू-टर्न यावरुन महाविकास आघाडी सरकारला टीकेचं धनी व्हावं लागतंय. विरोधी पक्षाने या गोंधळावरुन सरकारला धारेवर धरलंय, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनाचे नियम म्हणजे राज्य सरकारला खो-खो चा खेळ वाटला का? असा संतप्त सवाल विचारला आहे. लॉकडाउनच्या सारख्या निर्णयामध्ये एवढा गोंधळ कसा होतो असं […]
ADVERTISEMENT

राज्यातील ठराविक जिल्ह्यांमध्ये केलेली अनलॉकची घोषणा आणि त्यानंतर घ्यावा लागलेला यू-टर्न यावरुन महाविकास आघाडी सरकारला टीकेचं धनी व्हावं लागतंय. विरोधी पक्षाने या गोंधळावरुन सरकारला धारेवर धरलंय, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनाचे नियम म्हणजे राज्य सरकारला खो-खो चा खेळ वाटला का? असा संतप्त सवाल विचारला आहे.
लॉकडाउनच्या सारख्या निर्णयामध्ये एवढा गोंधळ कसा होतो असं विचारत सरकारच्या बालिशपणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
• करोनाचे निर्णय म्हणजे खो-खो खेळ वाटला की काय सरकारला?
• संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय तुमच्या अशा बालिशपणामुळे लॉकडाऊनचा सारख्या निर्णयात एव्हढा गोंधळ?@CMOMaharashtra #CovidScam
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 3, 2021
दरम्यान, या सगळ्या गोंधळानंतर विरोधी पक्षाने देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यामुळे हा नेमका निर्णय काय होता आणि बैठकीत नेमकं काय ठरलं याविषयी ‘मुंबई तक’ने (Mumbai Tak) थेट विजय वडेट्टीवार यांची Exclusive मुलाखत घेतली. पाहा यावेळी वडेट्टीवार हे नेमकं काय-काय म्हणाले.
प्रश्न: महाराष्ट्रात अनलॉकिंग सुरु झालं आहे का, अनलॉक होणार का?










