दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या राग, बेडरुममध्ये घुसून प्रेयसीची हत्या; प्रियकराने स्वत:लाही संपवलं!
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या कासारिओ गोल्ड संकुलातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तरुणाने देखील आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मृतक प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अनिल मधुकर साळुंखे (वय 33 वर्ष) असे मृत आरोपीचे नाव आहे. तर […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या कासारिओ गोल्ड संकुलातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तरुणाने देखील आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मृतक प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अनिल मधुकर साळुंखे (वय 33 वर्ष) असे मृत आरोपीचे नाव आहे. तर ललिता सुरेश काळे (वय 28 वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.
प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या वादातून तिची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याची ही घटना डोंबिवलीसारख्या शहरात घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या कासारिओ गोल्ड संकूलमधील एका इमारतीमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मृतक प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मृतक अनिल हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील वडनेर गावाचा रहिवाशी होता. तर हत्या झालेली ललिता ही डोंबिवली पूर्वेतील कासारिओ गोल्ड संकूलमध्येच राहत होती. या दोघांमध्ये प्रेमसंबध होते. पण असं असतानाही ललिताने दुसऱ्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नव्हे तर दुसऱ्या तरुणासोबत तिचा कुंकवाचा कार्यक्रम देखील आटोपला होता.
याच गोष्टीचा राग मनात धरून अनिल याने ललिताला कायमचं संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याने ललिताला शेवटचं भेटावं असा बहाणा केला. ललिताने देखील या शेवटच्या भेटीला परवानगी दिली. त्यामुळे अनिल 29 मे रोजी तिच्या राहत्या घरी सायंकाळच्या सुमारास आला.