‘मेरा दिल ये पुकारे…’ या गाण्यावर माधुरीने केली पाकिस्तानी गर्लची डान्स कॉपी; नेटकरी भडकले, म्हणाले,…

मुंबई तक

‘मेरा दिल ये पुकारे आजा…’ या गाण्याच्या फिव्हरने सोशल मीडिया यूजर्सना वेड लावलं आहे. या गाण्यावरील पाकिस्तानी तरुणी आयशाचा डान्सिंग व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून हे गाणे इंस्टाग्राम रील्सवर ट्रेंड करत आहे. केवळ मुलीच नाही तर अनेक मुलंही आयशाप्रमाणे डान्स करून त्यांचे व्हिडिओ शेअर करत आहेत. आता या यादीत डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितचेही नाव जोडले गेले आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘मेरा दिल ये पुकारे आजा…’ या गाण्याच्या फिव्हरने सोशल मीडिया यूजर्सना वेड लावलं आहे. या गाण्यावरील पाकिस्तानी तरुणी आयशाचा डान्सिंग व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून हे गाणे इंस्टाग्राम रील्सवर ट्रेंड करत आहे. केवळ मुलीच नाही तर अनेक मुलंही आयशाप्रमाणे डान्स करून त्यांचे व्हिडिओ शेअर करत आहेत. आता या यादीत डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितचेही नाव जोडले गेले आहे.

माधुरीने पाकिस्तानी मुलीच्या डान्सची केली कॉपी

‘मेरा दिल ये पुकारे आजा…’ या गाण्याच्या व्हायरल ट्रेंडनंतर बॉलिवूड दिवा माधुरी दीक्षितने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये माधुरी पाकिस्तानी मुलगी आयशाच्या डान्स मूव्हची कॉपी करताना दिसत आहे. तिनं हा ट्रेंड पुन्हा जिवंत केला आहे. व्हायरल झालेल्या गाण्यावरील माधुरीचा डान्स तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. पण या गाण्यावर डान्स केल्याने अनेक यूजर्स माधुरीला ट्रोल करत आहेत.

काय म्हणाले युजर्स?

एका युजरने माधुरीच्या डान्सची तुलना व्हायरल गर्ल आयशाच्या डान्सशी केली आणि लिहिले – हे चांगले नाही मॅडम सॉरी. दुसऱ्या युजरने लिहिले – प्लीज मॅडम, हा ट्रेंड नाही. दुसर्‍या यूजरने लिहिले, हा ट्रेंड आता ईरिटेड करणारा बनला आहे. एकाने लिहिले, तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते.

हे वाचलं का?

    follow whatsapp