महाभारतात ‘कृष्ण’ साकारणाऱ्या नितीश भारद्वाजांचं लग्न संपुष्टात, 12 वर्षांनी घेतला घटस्फोट

मुंबई तक

महाभारत या गाजललेल्या मालिकेत कृष्ण ही भूमिका साकारून ती अजरामर करणाऱ्या नितीश भारद्वाज यांचा आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. 12 वर्षांचं दोघांचं नातं संपुष्टात आलं आहे. नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी स्मिता या दोघांचा घटस्फोट झाला आहे. 2019 मध्येच या दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. आता या दोघांनी डिव्होर्स घेतला आहे. या दोघांना जुळ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाभारत या गाजललेल्या मालिकेत कृष्ण ही भूमिका साकारून ती अजरामर करणाऱ्या नितीश भारद्वाज यांचा आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. 12 वर्षांचं दोघांचं नातं संपुष्टात आलं आहे. नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी स्मिता या दोघांचा घटस्फोट झाला आहे. 2019 मध्येच या दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. आता या दोघांनी डिव्होर्स घेतला आहे. या दोघांना जुळ्या मुली आहेत. त्या आई स्मितासोबत इंदूर या ठिकाणी राहतात.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी सांगितलं की, ‘होय मी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी 2019 मध्ये अर्ज दिला होता. मला आता या विषयाच्या खोलात शिरायचं नाही की आमचा डिव्होर्स का झाला. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही जास्त भयंकर असतो. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्यात एक रिकामेपण सोसत असता’

हे वाचलं का?