महामोर्चा: ‘हे लफंगे महाराष्ट्र लुटायला आलेत’, ठाकरेंचा तुफान हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray Speech: मुंबई: महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) वतीने आज (17 डिसेंबर) मुंबईत महामोर्चाचं (Mahamorcha) आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यपाल हटाव आणि भाजपच्या मंत्र्यांची महापुरुषांबाबतची वादग्रस्त वक्तव्यं या सगळ्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. (mahamorcha uddhav thackerays storm attack on bjp mahavikas aghadi is aggressive to remove the governor)

ADVERTISEMENT

‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीए. हे लफंगे आहेत. ते महाराष्ट्र लुटायला आले आहेत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांसह शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली.

उद्धव ठाकरेंचं महामोर्च्यातील भाषण जसंच्या तसं….

हे वाचलं का?

‘बऱ्याच वर्षाने एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा या मोर्चाची घोषणा केली तेव्हा काही जणांनी मला विचारलं की, तुम्ही एवढं चालणार का? तेव्हा मी म्हटलं की, मी एकटाच नाही तर माझ्यासोबत महाराष्ट्रप्रेमी हे नुसतेच नाही तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत.’

‘आजपर्यंत ज्यांनी-ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्रानंतर असं दृश्य देशाने आणि जगाने पहिल्यांदाच पाहिलं असेल. 60-62 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बराच संघर्ष करावा लागला. पण अजूनही बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही.’

ADVERTISEMENT

‘आज सर्व पक्षाचे झेंडे ही ताकद महाराष्ट्राची आहे. सर्व पक्ष एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आहेत जे या पक्षात एकवटलेले नाहीत. स्वत:ला जे बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तोतये त्यांचे विचार पुढे घेऊन जातोय असं सांगणारे.. पण बाळासाहेबांचे विचार हे खुर्चीसाठी दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तरी बेहत्तर पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता हिच्याबरोबर करु देणार नाही. जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला खाली झुकविल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेनाप्रमुखांची निती होती.’

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’ला भाजप देणार उत्तर! राज्यभरात “माफी मांगो” आंदोलन

‘मी तर आता त्यांना राज्यपाल मानतच नाही. खरं तर ते पद मोठं आहे. त्या पदाचा मी नक्की मान राखतो. पण त्या पदावर कोणीही बसावं आणि कोणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही.’

‘राज्यपाल कोण असावा? केवळ केंद्रामध्ये कोण बसतो त्याच्या घरी काम करणारा माणूस कुठेतरी सोय म्हणून पाठवून द्यायचा. नाही पण ते राष्ट्रपतींचे दूत असतात आणि त्यांनी त्यासारखं वागलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत बोलतायेत.’

‘जर सावित्रीबाई, महात्मा फुले नसते तर आपण कुठे असतो. त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्याने भीक हा शब्द वापरुन दाखवून दिला आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी धोंडमार सहन केली नसती तर आपल्याला शिक्षणच मिळालं नसतं आणि आपण पण यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे.’

‘यांच्या मंत्रिमंडळात मंत्री कसे आहेत तर एक हे बौद्धिक दारिद्र्य असलेले, दुसरे आमच्या सुप्रिया ताईंना वेडंवाकडं बोलणारे आणि छत्रपतींचं नाव घेणार. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीए. हे लफंगे आहेत. ते महाराष्ट्र लुटायला आले आहेत. या लफंग्यांना महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.’

‘कारण छत्रपतींनी मातेबद्दल, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे.’

‘एक-दोन मंत्री झाल्यानंतर तिसरे जे मंत्री आहेत. ते तर दुर्दैवाने मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांनी तर चक्क महाराजांची आग्र्याहून सुटका झाली त्यांची तुलना या खोकेवाल्यांबरोबर केली.’

‘मविआ’च्या ‘महामोर्चा’ला अशोक चव्हाणांची दांडी : काय सांगितलं कारण? भूमिकाही केली स्पष्ट

‘आता मुंबईचा लचका कसा तोडतायेत.. तर जे प्रोजेक्ट आपण करायला घेतले होते. वरळी आरे डेअरीच्या जागेवर जागतिक पातळीचं मत्सालय करणार होतो. ते करणारच ते दुसरीकडे आम्ही होऊ देणार नाही. मुंबईचा आणि महाराष्ट्राचा लचका कसा तोडतात तेच आम्ही बघतो. पण ती सुद्धा जागा बिल्डरच्या घशात घालतायेत.’

‘आम्ही सगळेजण ही आमची मातृभूमी मानतो. पण आमचे पालकमंत्री हिशोब हे फक्त स्क्वेअर फुटात करतात. मुंबई ही काही स्क्वेअर फुटात विकली जाणारी जागा नाही. ती आमची माय आहे. ती आमची मुंबाई आहे.’

‘एकीकडे महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवायची आणि महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असणारे उद्योग दुसऱ्या राज्यात पळवून नायचे. गावं कुरतडायला लागायची. म्हणजे चहूबाजूने महाराष्ट्र हा कसा संपून जाईल. हा यांचा प्रयत्न आहे. आजचा मोर्चा ही सुरुवात आहे.’ असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर चढवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT