महाराष्ट्रासाठी चांगली बातमी… ‘या’ 12 जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मागील काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारने (Maharashtra Govt) पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन (Lockdown) देखील लागू केला आहे. पण आता या सगळ्यात एक चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. (Corona Cases Decline) त्यामुळे आरोग्य संस्थांवरील देखील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ही अत्यंत झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं होतं. पण आता रुग्णांची संख्याही हळूहळू कमी होत असल्याने कोरोनाची साखळी तुटत असल्याचं दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत असल्याने प्रशासनाने देखील काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. याबाबतचा संपूर्ण डेटा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केला आहे.

पाहा कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या होत आहे कमी:

  • मुंबई

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • मुंबई उपनगर

  • ठाणे

  • ADVERTISEMENT

  • औरंगाबाद

  • ADVERTISEMENT

  • नांदेड

  • लातूर

  • भंडारा

  • धुळे

  • गोंदिया

  • जळगाव

  • नंदूरबार

  • वाशिम

  • कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास काय करावे?

    पाहा गेल्या 15 दिवसात या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्येत किती घट झाली आहे:

    1. मुंबई (Mumbai)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान मुंबईत कोरोनाचे तब्बल 51 हजार 513 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान मुंबईत कोरोनाचे तब्बल 43 हजार 581 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 23 हजार 903 नवे रुग्ण सापडले आहेत.

    2. मुंबई उपनगर (Mumbai Suburban)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान मुंबईच्या उपनगरात कोरोनाचे 9 हजार 094 नवे रुग्ण सापडले होते.

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान मुंबई उपनगरात कोरोनाचे 7 हजार 696 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान मुंबई उपनगरात रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 6 हजार 520 नवे रुग्ण सापडले आहेत.

    3. ठाणे (Thane)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 38 हजार 483 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 35 हजार 091 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाली असल्याचे दिसून येत आहे. या दिवसात 25 हजार 997 नवे रुग्ण सापडले आहेत.

    4. औरंगाबाद (Aurangabad)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 10 हजार 214 नवे रुग्ण सापडले होते.

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 9 हजार 957 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 6 हजार 748 नवे रुग्ण सापडले आहेत.

    5. नांदेड (Nanded)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे 10 हजार 728 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे 8 हजार 214 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान नांदेडमधील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 5 हजार 577 नवे रुग्ण सापडले आहेत.

    6. लातूर (Latur)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान लातूर जिल्ह्यात कोरोनाचे 11 हजार 566 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान लातूर जिल्ह्यात कोरोनाचे 10 हजार 431 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान लातूरमधील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 8 हजार 345 नवे रुग्ण सापडले आहेत.

    7. भंडारा (Bhandara)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे 9 हजार 550 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान मुंबईत कोरोनाचे 7 हजार 598 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान भंडारा जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 6 हजार 751 नवे रुग्ण सापडले आहेत.

    8. धुळे (Dhule)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान धुळे जिल्ह्यात कोरोनाचे 3 हजार 015 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान धुळे जिल्ह्यात कोरोनाचे 2 हजार 747 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान धुळ्यातील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 2 हजार 373 नवे रुग्ण सापडले आहेत.

    9. गोंदिया (Gondia)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचे 4 हजार 798 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान गोंदियात कोरोनाचे तब्बल 4 हजार 340 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान गोंदियातील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 3 हजार 295 नवे रुग्ण सापडले आहेत.

    10. जळगाव (Jalgaon)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 7 हजार 577 नवे रुग्ण सापडले होते.

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 7 हजार 574 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान जळगावमधील रुग्णसंख्येत घट झाली असून 7 हजार 186 नवे रुग्ण सापडले आहेत.

    11. नंदूरबार (Nandurbar)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान नंदूरबार जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 4 हजार 795 नवे रुग्ण सापडले होते.

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाचे 2 हजार 693 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान नंदूरबारमधील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 1 हजार 256 नवे रुग्ण सापडले आहेत.

    12. वाशिम (Washim)

    • 11 एप्रिल ते 17 एप्रिल: या दरम्यान वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 3 हजार 494 नवे रुग्ण सापडले होते

    • 18 एप्रिल ते 24 एप्रिल: या दरम्यान वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 3 हजार 264 नवे रुग्ण सापडले होते

    • 25 एप्रिल ते 1 मे: या दरम्यान वाशिममधील रुग्णसंख्येत घट झाली असून फक्त 2 हजार 736 नवे रुग्ण सापडले आहेत.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT