Maharashtra Bandh: ‘बंद’ करण्यावरून तुफान हाणामारी, महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनीष जोग, जळगाव

ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi)पुकारलेल्या आजच्या बंदला (Maharashtra Bandh) गालबोट लागलं आहे. महाविकास आघाडी व भाजपचे (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर ही हाणामारी झाली. त्यात काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज (11 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, या संदर्भात अजूनपर्यंत वरणगाव पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार आलेली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.

हे वाचलं का?

कार्यकर्त्यांमध्ये का झाली हाणामारी?

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार वरणगाव शहरातही महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे कार्यकर्ते बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करत होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, याचवेळी भाजपचे कार्यकर्ते मात्र, व्यापाऱ्यांना बंद पाळू नका, असे सांगत होते. याच कारणावरून वादाची ठिणगी पडली आणि तणाव निर्माण झाला. तेव्हा दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते हे आमने-सामने आल्याने शाब्दिक वाद वाढला आणि थेट हाणामारीला सुरुवात झाली.

ADVERTISEMENT

बुलडाण्यात भाजप कार्यकर्त्याला दुकानातच कोंडलं!

दुसरीकडे, बुलडाण्यात देखील एक असाच एका प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. पण जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट बकाल येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन करीत होते.

मात्र, याचवेळी भाजप कार्यकर्ता असलेल्या एका दुकानदाराने आपलं दुकान बंद करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यक्रर्ते हे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी बळजबरीने दुकान बंद केलं व दुकानदाराला आतच कोंडून ठेवलं.

‘बंद’ पाळला नाही म्हणून शिवसेना उपमहापौरांच्या पतीनेच रिक्षा चालकांना दिला चोप?

ठाण्यातही रिक्षाचालकांना शिवसैनिकांकडून मारहाण

याशिवाय ठाण्यात देखील रिक्षा चालकांना शिवसैनिकांकडून चोप देण्यात आला. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज (11 ऑक्टोबर) बंद पुकारला होता. पण यावेळी अनेकांना दुकानं आणि इतर गोष्टी बंद करण्यास भाग पाडलं जात होतं. त्याचवेळी दुसरीकडे ठाण्याच्या उपमहापौरांचे पती हे स्वत: रस्तावर उतरुन रिक्षा चालकांना चोप देत असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या या बंदमध्ये शिवसेना कार्यकर्ते मात्र, जबरदस्ती करत असल्याचं यावेळी दिसून आलं. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उपमहापौरांचे पती पवन कदम हे स्वत: हातात काठी घेऊन रिक्षा चालकांना चोप देत असल्याचं आता विरोधकांकडून बोललं जात आहे. याचाच एक व्हीडिओ देखील आता समोर आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT