लाइव्ह

Marathi News Live : उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना पुण्यातच दिला धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:21 PM • 21 Jan 2024

    आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

    पुण्यातील राजकारणात उद्धव ठाकरेंनी अजित पवार गटाला धक्का दिला. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले शैलेश मोहिते पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तळेगांव दाभाडे येथे युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला.
  • 12:36 PM • 21 Jan 2024

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला -देवेंद्र फडणवीस

    "जुनी आठवण...", असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणालेत "नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे", असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी कारसेवकांमध्ये आपणही होतो, असा पुरावा दिला आहे. या फोटोची आता चर्चा होत आहे.
  • 12:09 PM • 21 Jan 2024

    आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीमध्ये -एकनाथ शिंदे

    "दीड लाख कर्मचारी मराठा समाजाचा इम्पेरिकल डेटा गोळा करत आहे. त्या आधारावर मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे", अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
  • 11:01 AM • 21 Jan 2024

    26 जानेवारी रोजी जरांगे पोहोचणार मुंबईत

    जरांगे पाटील हे मुंबईत येऊन आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहेत. २२ जानेवारी रोजी मोर्चा बाराबाभळी ते रांजगाव असा प्रवास करणार आहे. २३ जानेवारी रोजी रांजणगाव येथून निघूने ते चंदनगर-खराडी बायपास येथे पोहोचतील. २४ जानेवारी रोजी लोणावळा येथे येतील. २५ जानेवारी रोजी नवी मुंबईतील वाशीला पोहोचणार आहे. त्यानंतर २६ जानेवारी रोजी आझाद मैदान, किंवा शिवाजी पार्क येथे उपोषण सुरू कऱणार आहेत.
  • ADVERTISEMENT

  • 10:57 AM • 21 Jan 2024

    मनोज जरांगेंनी सोडलं मातोरी

    मराठा आरक्षणासाठी निघालेल्या या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर मातोरी (ता. शिरूर) येथे मुक्काम झाला.
follow whatsapp

ADVERTISEMENT