Mahayuti : मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या, शिंदेंचे मंत्री महायुतीत नाराज?
उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांच्यासह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना पीए मिळालेले नाही. त्यांच्या पीए आणि ओएसडीचे प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मंत्रिपदं मिळून महिने उलटले, पण अजूनही पीए, OSD नाहीत

एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची महायुतीमध्ये नाराजी?

मुख्यमंत्री कार्यालयात का अडकून पडले प्रस्ताव?
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सध्या असंतोषाची लाट निर्माण झाल्याचं चित्र आहे. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक (पीए) आणि विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यांच्या नियुक्त्यांच्या शिफारशी सत्ता स्थापनेनंतर अजूनही मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) अडकून पडलेल्या आहेत. यामुळे मंत्र्यांना त्यांची प्रशासकीय कामं करण्यासाठी अडचण येतेय, अशी माहिती एका सुत्राने इंडिया टुडेला दिली आहे. एकूणच या विषयामुळे महायुतीत असलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये आता नाराजीची लाट असल्याचं दिसतंय. (Maharashtra Cabinet Ministers PA and OSD Appointments are pending)
उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांच्यासह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना पीए मिळालेले नाही. त्यांच्या पीए आणि ओएसडीचे प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
हे ही वाचा >> मर्चंट नेव्हीमध्ये असलेला धुळ्यातला तरूण अरबी समुद्रात बेपत्ता, कंपनीने कुटुंबाला सांगितलं पाय घसरून...
यापैकी काही अधिकाऱ्यांनी 2024 पासून विविध विभागात कामं सुरू केली आहेत. मात्र, त्यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्री कार्यालयाने रोखून ठेवल्या आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची तपासणी करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी आयएएस श्रीकर परदेशी आणि अतुल वाझे यांच्यावर सीएमओने सोपवले आहे.
2001 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी परदेशी यांनी पंतप्रधान कार्यालयापासून ते महाराष्ट्र सरकारपर्यंत विविध महत्त्वाची पदं भूषवली आहेत. ते सध्या सीएमओचे सचिव म्हणून काम करत आहेत.