महाराष्ट्र सावध! दक्षिण आफ्रिकेसह ‘या’ देशांतून येणाऱ्यांना क्वारंटाईन, कोविड चाचणी सक्तीची

मुंबई तक

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर चिंतेचं सावट पसरलं आहे. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील देशांसाठी स्वतःची दारं बंद केली आहेत. भारतात हा निर्णय झाला नसला, तरी राज्य सरकारने मात्र, सावध भूमिका घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने दक्षिण आफ्रिकेसह जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी क्वारंटाईनसह काही गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत. (Maharashtra […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर चिंतेचं सावट पसरलं आहे. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील देशांसाठी स्वतःची दारं बंद केली आहेत. भारतात हा निर्णय झाला नसला, तरी राज्य सरकारने मात्र, सावध भूमिका घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने दक्षिण आफ्रिकेसह जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी क्वारंटाईनसह काही गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत. (Maharashtra guidelines for international travellers)

ओमिक्रॉन व्हेरिएंट सर्व प्रथम आढळून आलेल्या दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रासह ज्या ठिकाणी या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या राष्ट्रांना जोखमीच्या देशांच्या यादीत (countries at risk) टाकण्यात आलं आहे. या देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शन नियमावली जाहीर केली आहे. प्रवाशांसाठी या गोष्टी सक्तीच्या असणार आहेत.

Omicron Variant : आफ्रिकेसह इतर देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

जोखमीच्या (at risk) यादीत कोणते देश?

हे वाचलं का?

    follow whatsapp