राज्यात रात्रीचा लॉकडाउन लागणार?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सशी झाली चर्चा, आज निघणार आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग महाराष्ट्रासह देशभरात झपाट्याने वाढत असून, केंद्र सरकारने राज्यांना सतर्क करत नाईट कर्फ्यूसह निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यात एकाच दिवसांत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले तब्बल 23 रुग्ण आढळून आल्यानं आता निर्बंध आणखी कडक केले जाण्याची दाट शक्यता आहे. आगामी ख्रिसमस, नववर्ष, विवाह सोहळे, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक पावलं उचलली जाणार दाट शक्यता असून, यासंदर्भातील नियमावली आज जाहीर केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून कडक पावलं उचलण्याची सूचना केल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील, यावर टास्क फोर्सच्या बैठक चर्चा करण्यात आली. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

Omicron : चिंतेत भर! महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 23 नवे रूग्णांची नोंद, एकूण संख्या 88

हे वाचलं का?

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गर्दी रोखण्यासाठी गृह विभागाकडून न्यू इयर पाटर्य़ांवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीतही यावर चर्चा करण्यात आली. ओमयक्रोनचा धोका टाळण्यासाठी नववर्षांच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पाटर्यांवरील निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. या काळात रात्रीची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास व इतर बाबींच्या परवानगीबाबतही चर्चा करण्यात आली असून, आज (24 डिसेंबर) दुपारपर्यंत नियमावलीचे आदेश काढण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.

Omicron Threat: तज्ज्ञ म्हणतात.. ओमिक्रॉनमुळे भारतात येईल तिसरी लाट, दररोज 2 लाखांपर्यंत सापडतील रुग्ण!

ADVERTISEMENT

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात झाली. या बैठकीला मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित उपस्थित होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT