सचिन वाझेंच्या NIA कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ, कोर्टाचा निर्णय
अँटेलिया प्रकरणात NIA च्या अटकेत असलेले आणि मनसुख हिरेनच्या हत्येचा आरोप असलेले सचिन वाझे यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. NIA कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. सचिन वाझे यांना जी काही वैद्यकीय सेवा पुरवावी लागेल ती देखील पुरवण्यात यावी असंही NIA कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सचिन वाझे यांना आज NIA ने कोर्टात हजर […]
ADVERTISEMENT
अँटेलिया प्रकरणात NIA च्या अटकेत असलेले आणि मनसुख हिरेनच्या हत्येचा आरोप असलेले सचिन वाझे यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. NIA कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. सचिन वाझे यांना जी काही वैद्यकीय सेवा पुरवावी लागेल ती देखील पुरवण्यात यावी असंही NIA कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सचिन वाझे यांना आज NIA ने कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर कोर्टाने त्यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.
ADVERTISEMENT
#UPDATE | Maharashtra: Mumbai's Special NIA court extends NIA custody of Sachin Waze till April 7, directs NIA to provide all medical aid to Waze.
Waze is an accused in Mansukh Hiren death case. https://t.co/W4K5FS3WtS
— ANI (@ANI) April 3, 2021
सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांनी रचला मनसुखच्या हत्येचा कट, NIA ची कोर्टात माहिती
सचिन वाझेंना १३ मार्चला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच NIA ने त्यांना अटक केली. त्यांना आता आणखी काळ कोठडीत ठेवणं अन्यायकारक होईल असं सचिन वाझेंचे वकील कोर्टात म्हणाले. तर NIA चे वकील अनिल सिंग म्हणाले की या संपूर्ण प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचला आहे आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझेंची कोठडी महत्त्वाची असल्याचे सांगितलं. मागच्या सुनावणीच्या वेळी मला बळीचा बकरा बनवलं जातं आहे असं सचिन वाझे म्हणाले होते. त्याचीही बरीच चर्चा झाली होती.
हे वाचलं का?
सचिन वाझे यांनी अनेक आरोप मान्य केल्याचं गेल्या सुनावणीच्या वेळी एनआयएने कोर्टात सांगितलं होतं. मात्र आज सचिन वाझेंनी कोणतीच कबुली दिली नसल्याचं सांगितलं आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत असंही सचिन वाझेंनी म्हटलं आहे.
टिप्सी बारची रेड, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे, जाणून घ्या काय आहे कनेक्शन?
ADVERTISEMENT
मागच्या वेळी काय घडलं होतं?
ADVERTISEMENT
सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांनी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचला, त्यासाठी या दोघांमध्ये एक मिटिंगही जाली होती अशी माहिती ३० मार्चला NIA ने कोर्टात दिली. NIA ने विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना कोर्टात हजर केलं होतं. नरेश गोर याने याने एक स्टेटमेंट दिलं आहे ज्यानंतर सात सीमकार्ड, एक ब्लँक कार्ड ताब्यात घेण्यात आलं आहे. ही सीम कार्ड अॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनची गरज होती, तो फोनही ताब्यात घेण्यात आला आहे. नरेश गोर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यात असंही म्हटलं आहे की एकूण १४ नंबर होते त्यातले पाच सचिन वाझेंना देण्यात आले होते. इतर क्रमांकांच्या पुढे OK असे लिहिण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT